कांद्याचा वापर न करता बनवा टेस्टी बटाट्याची चटणी, टिफिन बॉक्ससाठी बेस्ट पर्याय Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
घरोघरी नेहमी कांदा आणि बटाटा शिजवून भरीत बनवलं जातं. मात्र, कांदा न वापरता बटाट्याची नव्या पद्धतीची टेस्टी चटणी कशी बनवावी? पाहा
अमिता शिंदे, प्रतिनिधी
वर्धा : बटाटा खाणं अनेक लोकांना आवडते. यामुळे घरोघरी नेहमी कांदा आणि बटाटा शिजवून भरीत बनवलं जातं. मात्र, कांदा न वापरता बटाट्याची नव्या पद्धतीची टेस्टी चटणी कशी बनवावी? जी प्रवासासाठी तसेच मुलांना टिफिन बॉक्समध्ये देण्यासाठी देखील अगदी सोयीस्कर आणि सोपी आहे. याचीच रेसिपी वर्ध्यातील गृहिणी मिना शिंदे यांनी सांगितली आहे.
advertisement
बटाट्याची चटणी बनवण्यासाठी साहित्य
साली सकट जाडसर काप केलेले बटाटे, सात ते आठ लसूण कळ्या, तिखट, मीठ, हळद, जिरे, तळण्यासाठी तेल आणि कोथिंबीर हे साहित्य लागेल.
बटाट्याची चटणी बनवण्यासाठी कृती
सर्वप्रथम कच्चे बटाटे सालीसकट जाडसर चिरून घ्यायचे आहेत. हे बटाटे स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत. आता कढईमध्ये तेल घालून तेल गरम झाल्यावर सगळे बटाटे त्यात टाकायचे आहेत आणि परतून घ्यायचे आहेत. जवळजवळ पाच ते दहा मिनिटे हे बटाटे तेलात शिजवायचे आहेत. बटाटे ऑलमोस्ट शिजत आल्यावर त्यात लसूण कळ्या ॲड करायचे आहेत आणि लसूण शिजू द्यायचा आहे.
advertisement
होळीसाठी स्पेशल थंडाई तयार करा घरच्या घरी; सोप्या रेसिपीचा पाहा Video
त्यानंतर जिरे, तिखट, मीठ, हळद, घालून शिजू द्या आता बटाटे लसूण आणि सर्व मिश्रण एकत्र करून घ्या. चांगलं परतून झाल्यानंतर थंड होण्यासाठी ठेवा. आता एखादी वाटी किंवा पेला घेऊन सर्व बटाटे आणि लसूण हे कुस्करून एकजीव करून घ्यायचे आहेत. सालीसकट एकजीव झाल्याने टेस्ट आणखीनच छान लागते. आता कोथिंबीर टाकून एकत्र करून घेऊन खाण्यासाठी बटाट्याची झटपट चटणी तयार झाली आहे. तर अशाप्रकारे अगदी कमी साहित्यात, कमी वेळेत, झटपट बनून तयार होणारी बटाट्याची चटणी तुम्हीही नक्की करून बघा.
Location :
Wardha,Wardha,Maharashtra
First Published :
March 23, 2024 12:02 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
कांद्याचा वापर न करता बनवा टेस्टी बटाट्याची चटणी, टिफिन बॉक्ससाठी बेस्ट पर्याय Video