होळीसाठी स्पेशल थंडाई तयार करा घरच्या घरी; सोप्या रेसिपीचा पाहा Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
होळीला आवर्जून एक पदार्थ केला जातो तो म्हणजे थंडाई. होळीसाठी घरच्या घरी कशा पद्धतीनं थंडाई तयार करायची? याचीच रेसिपी छत्रपती संभाजीनगरमधील गृहिणी मेघना देशपांडे यांनी सांगितली आहे.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : होळीच्या सणाची प्रत्येकजण वाट पाहत असतो. होळी म्हटलं की सर्वत्र रंगाची उधळण होते. सर्वत्र रंगमय वातावरण होऊन जातं. होळीसाठी वेगवेगळे पदार्थ ही आपण तयार करत असतो. त्यामध्ये पुरणपोळी ही तर होतेच पण होळीला आवर्जून एक पदार्थ केला जातो तो म्हणजे थंडाई. तर या होळीसाठी घरच्या घरी कशा पद्धतीनं थंडाई तयार करायची? याचीच रेसिपी छत्रपती संभाजीनगरमधील गृहिणी मेघना देशपांडे यांनी सांगितली आहे.
advertisement
थंडाई तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
पाव वाटी बदाम, पाव वाटी काजू आणि पिस्ता, दोन टेबल स्पून मगज बी तिची पावडर करून घ्याची आहे. बडी सोप, पांढरे तीळ, काळी मिरी, खसखस, वेलची आणि जायफळ पूड हे सर्व साहित्य दोन टेबल स्पून घ्यायचे आहे. केसर, सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या,पाव वाटी मिल्क पावडर एवढं साहित्य लागेल.
advertisement
थंडाई बनवण्यासाठी कृती
सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी काजू आणि पिस्ता मगज बी, बडीशोप, पांढरे तीळ, काळी मिरी, खसखस, वेलची, जायफळची पूड, केसर आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकून हे सर्व पदार्थ मिक्सरमधून रवाळ असं काढून घ्यायचं. बदाम चार पाच तास भिजू घालत ठेवायचे. त्यानंतर त्याचे वरचे छिलके काढून घ्यायचे आणि त्यामध्ये थोडीशी पिठीसाखर आणि पाव वाटी मिल्क पावडर घालून ते मिक्सरमधून काढून घ्यायचं.
advertisement
कवठाची पारंपरिक चटणी 5 मिनिटांत घरीच कशी बनवाल? सोप्या रेसिपीचा पाहा Video
थंडाई तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये तयार केलेला मसाला टाकायचा. त्यामध्ये दूध टाकायचं थोडसं आणि ते मिश्रण दोन तास तसेच मुरू द्यायचं. तुम्हाला जेवढे ग्लास थंडाई करायचे तेवढं दूध घ्यायचं ते दूध थंड असावे. त्यानंतर आपण तयार केलेले जे मसाल्याचे मिश्रण आणि बदामाचे मिश्रण आणि दूध हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं. त्यामध्ये थोडासा बर्फ देखील टाकायचा आणि तुम्हाला जेवढं गोड लागतं. त्यानुसार साखर टाकायची आणि हे सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं. आणि अशा पद्धतीनं थंडाई तयार होतो, असं मेघना देशपांडे सांगतात.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
March 23, 2024 8:58 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
होळीसाठी स्पेशल थंडाई तयार करा घरच्या घरी; सोप्या रेसिपीचा पाहा Video