advertisement

'तेव्हा आम्ही खूप घाबरायचो', गोविंदासोबतच्या अफेअरवर नीलम कोठारी स्पष्टच बोलली; पहिल्यांदाच सांगितलं नेमकं काय घडलेलं

Last Updated:
Govinda-Neelam Kothari Affair: आज इतक्या वर्षांनंतर, जेव्हा गोविंदाचं वैयक्तिक आयुष्य वादळात सापडलं आहे, तेव्हा खुद्द नीलमने या अफेअरच्या चर्चांवर आपलं मौन सोडलं आहे.
1/7
९० च्या दशकात ज्या जोडीने मोठ्या पडद्यावर आग लावली होती, ती म्हणजे गोविंदा आणि नीलम कोठारी. 'इलजाम', 'खुदगर्ज' आणि 'हत्या' अशा एकापाठोपाठ एक हिट चित्रपटांनी या जोडीला घराघरांत पोहोचवलं. पण पडद्यावरची ही केमिस्ट्री खऱ्या आयुष्यातही आहे का? असा प्रश्न अनेक दशकं चाहत्यांना पडला होता.

2/7
आज इतक्या वर्षांनंतर, जेव्हा गोविंदाचं वैयक्तिक आयुष्य वादळात सापडलं आहे, तेव्हा खुद्द नीलमने या अफेअरच्या चर्चांवर आपलं मौन सोडलं आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान ५६ वर्षीय नीलमला जेव्हा गोविंदासोबतच्या नात्याबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा तिने या चर्चांवर मौन सोडलं आहे.

3/7
ती म्हणाली,
ती म्हणाली, "अरे देवा! हे कोण म्हणालं? गोविंदाजी खूप चांगल्या स्वभावाचे आहेत, आम्ही खूप हिट कामं एकत्र केली, पण आमच्यात अफेअर होतं या बातमीत काहीच तथ्य नाही. नव्वदच्या दशकात जर तुम्ही एखाद्या कलाकारासोबत दोन-तीन चित्रपट सलग केले, तरी तुमची नावं जोडली जायची. त्यावेळी कोणी स्पष्टीकरण द्यायला नसायचं, त्यामुळे प्रेसला जे वाटायचं ते छापायचे. खरं सांगायचं तर आम्ही त्याकाळी प्रेसला खूप घाबरायचो, कारण त्यांच्या लेखणीत खूप ताकद होती."
advertisement
4/7
नीलम जरी आज या चर्चांना नाकारत असली, तरी एकेकाळी गोविंदा मात्र तिच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. एका जुन्या मुलाखतीत गोविंदाने कबूल केलं होतं की, तो नीलमच्या प्रेमात पडला होता. इतकंच नाही तर नीलमसाठी त्याने त्याची पत्नी सुनीतासोबतचा साखरपुडाही मोडला होता.

5/7
 "जर सुनीताने पाच दिवसांनंतर फोन करून माझी मनधरणी केली नसती, तर मी नीलमशी लग्न केलं असतं," असं खळबळजनक विधान त्यावेळी गोविंदाने केलं होतं. नीलमचा साधेपणा आणि तिचं सौंदर्य गोविंदाला इतकं भावलं होतं की, तो तिच्याशी लग्न करण्यासाठी पूर्णपणे तयार होता.

6/7
गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा हिने त्याच्यावर विवाहबाह्य संबंधांचे गंभीर आरोप केले असून, ती घटस्फोटासाठी कोर्टात गेल्याच्या चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर नीलमचं नाव पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागल्याने तिने स्वतः समोर येऊन आपली बाजू मांडली आहे.

7/7
नीलम कोठारीने २०११ मध्ये अभिनेता समीर सोनीशी दुसरं लग्न केलं आणि आता ती आपल्या मुलीसोबत सुखी संसार करत आहे. तर दुसरीकडे गोविंदा आणि सुनीता यांना दोन मुलं आहेत, पण सध्या त्यांच्या नात्यात पडलेली ही दरी सावरणार की मोडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement