advertisement

Upasana Singh: 'कपिल शर्मा शो' फेम अभिनेत्रीकडून सिनेइंडस्ट्रीची पोलखोल; म्हणाली, 'ग्लॅमर फक्त नावासाठी, पोट भरायलाही पैसे...'

Last Updated:

अनेकांना वाटतं ग्लॅमर आणि प्रसिद्धी मिळत असलेली सिनेइंडस्ट्रीमध्ये फारच आरामाचं आणि सोप्प काम असते. पण याची ही दुसरी बाजू आजवर केव्हाच लोकांसमोर आलेली नाही. आता हिच बाजू हिंदी सिने इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री उपासना सिंह हिने समोर आणली आहे.

News18
News18
'द कपिल शर्मा शो'च्या माध्यमातून पिंकी बुआ म्हणून प्रसिद्ध झालेली उपासना सिंह हिने इंडस्ट्रीबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहेत. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणाऱ्या पिंकी बुआने कलाकारांना मिळणाऱ्या तुटपुंज्या मानधनाबद्दल सत्य सांगितले. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत, उपासना सिंगने टिव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांना संघर्ष करावा लागणाऱ्या आर्थिक टंचाईबद्दल भाष्य केले आहे. अनेकांना वाटतं ग्लॅमर आणि प्रसिद्धी मिळत असलेलं हे क्षेत्र फारच आरामाचं आणि सोप्प आहे. पण याची ही दुसरी बाजू आजवर केव्हाच लोकांसमोर आलेली नाही. आता हिच बाजू हिंदी सिने इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री उपासना सिंह हिने समोर आणली आहे.
उपासना सिंहने अलीकडेच IANS ला मुलाखत दिली आहे. अभिनेत्री म्हणाली की, "सर्वसामान्य लोकांना वाटतं की, फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणारे सर्वच कलाकार खूपच ग्लॅमरस, आलिशान आणि आरामात आयुष्य जगतात. पण खरं तर सत्य याच्या अगदी उलट आहे." अभिनेत्रीने पुढे सांगितले की 'सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन' (CINTAA) ची सरचिटणीस म्हणून आलेल्या अनुभवांवरून तिनं हे वास्तव मांडलंय. "अनेक कलाकार दिवसाला केवळ 1200 ते 5000 रुपये कमावू शकतात. त्यातून अनेकांचे पैसेही कापले जाते. काहींना तर पूर्ण वर्षात केवळ 4 ते 5 दिवसच काम मिळतं."
advertisement
"हा काही थोडा- फार पगार मिळतोय, त्यातही कलाकारांना कपातीचा सामना करावा लागतो. समजा, 5000 रुपयांच्या पर डे मानधनातली 25% रक्कम वजा केली जाते, असा दावाही तिनं केला. इतकं काम करूनही कलाकारांना त्यांच्या हक्काचे पैसे लगेचच मिळत नाही. कलाकारांना आपले हक्काचे पैसे मिळण्यासाठी 90 ते 120 दिवस वाट पाहावी लागते. जरा विचार करा, जर कोणी दिवसाला 5000 रूपये कमवत असेल, तर त्यातून महिन्याला 25,000 रूपये TDS म्हणून टॅक्स कापला जातो. त्यानंतर, कोऑर्डिनेटर त्यातून त्याचे कमिशन घेतो. मग त्यातही किती पैसे उरले? आणि हे मुंबईसारख्या शहरात घराचं भाडं, मुलांच्या शाळेची फी आणि दररोजचा खर्च हे सर्व मोठ्या प्रमाणावर आहे, तिथं एवढ्या कमी पैशात जगणं अशक्य आहे." 
advertisement
अभिनेत्रीने शेअर केलेल्या या रिॲलिटीमुळे अनेकांचे डोळे उघडले आहेत. उपासना एक हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्री असून तिने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अनेक लोकप्रिय टेलिव्हिजन सीरियलमध्ये तिने काम केलेले आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Upasana Singh: 'कपिल शर्मा शो' फेम अभिनेत्रीकडून सिनेइंडस्ट्रीची पोलखोल; म्हणाली, 'ग्लॅमर फक्त नावासाठी, पोट भरायलाही पैसे...'
Next Article
इराणच्या हाती जगाला 'ऑफलाईन' करणारं महाभयंकर हत्यार; इंटरनेटचा 'ब्लॅकआउट' होणार? WhatsApp, Instagram, Google होणार ठप्प
इराणच्या हाती जगाला 'ऑफलाईन' करणारं महाभयंकर हत्यार; इंटरनेटचा 'ब्लॅकआउट' होणार? WhatsApp, Instagram, Google होणार ठप्प
  • इराणचा सर्वात मोठा इशारा!

  • एका सेकंदात संपूर्ण जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार?

  • जगाची डिजिटल लाइफलाईन कापून टाकणारा

View All
advertisement