विदर्भात घरोघरी कशी बनते पुरणपोळी? होळीसाठी पाहा सोपी रेसिपी, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
यंदा होळीसाठी आपणही विदर्भातील ही पुरणपोळीची रेसिपी बनवू शकता. वर्धा येथील शिक्षिका वर्षा भोयर यांनी ही रेसिपी सांगितली आहे.
अमिता शिंदे, प्रतिनिधी
वर्धा: आपल्याकडे कोणताही सण म्हटलं की घरोघरी पुरणपोळी बनवली जाते. प्रत्येक भागात पुरणपोळी बनवण्याची पद्धत वेगळी आहे. विदर्भातील पुरणपोळीही प्रसिद्ध आहे. आता होळीनिमित्त नैवद्यासाठी पुरणपोळी बनवली जाते. अगदी कमी कणिक आणि जास्त पुरण वापरून बनवली जाणारी ही पुरणपोळी चवीला उत्तम असते. त्यामुळे यंदा होळीसाठी आपणही विदर्भातील ही पुरणपोळीची रेसिपी बनवू शकता. वर्धा येथील शिक्षिका वर्षा भोयर यांनी ही रेसिपी सांगितली आहे.
advertisement
पुरणपोळीसाठी साहित्य
दीड ग्लास चण्याची डाळ, दीड ग्लास समप्रमाणात साखर,( साखर आवडीप्रमाणे कमीजास्त करू शकता), 2 चमचे तांदूळ, गव्हाची कणिक, वेलची पूड, चिमूटभर मीठ, साजूक तूप हे साहित्य लागेल.
पुरणपोळी बनवण्याची कृती
सर्वप्रथम डाळ आणि तांदूळ 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. आता ही डाळ आणि 2 चमचे तांदूळ अंदाजाने पाणी घेऊन कुकर मध्ये शिजवून घ्यायचे. 4 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर थंड झाल्यानंतर, या गरम डाळीत साखर ऍड करून एकत्र करून घ्या. त्यात थोडं चिमूटभर मीठ ऍड करा आणि पूरण यंत्रात सर्व मिश्रण बारीक करून घ्या.
advertisement
आता एका कढईत चमचाभर साजूक तूप घालून त्यात हे मिश्रण आळवून घ्या. त्याचा रंग छान लालसर येईपर्यंत सतत चमच्याने ढवळत राहा. गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवा. वेलची पूड ऍड करा आणि मिश्रण थंड झाल्यानंतर पुरणाचे गोळे तयार करा. कणिक थोडं चिमूटभर मीठ घालून पाण्याने सैलसर, मऊ भिजवून घ्या. आता कणकेची छोटी पोळी करून त्यात पुरणाचा गोळा ठेऊन पॅक करून घ्या. कणकेच्या सहाय्याने पोळी लाटून घ्या किंवा हाताने थापून घेतली तरी चालेल. तव्यावर थोडं तूप लावून त्यात पोळी टाकून छान शिजू द्या. दोन्ही बाजूने पोळी परतून घ्या. अशाप्रकारे पुरणाची पोळी खाण्यासाठी तयार आहे.
advertisement
विदर्भात बनवली जाणारी ही पुरणपोळी आपणही घरी ट्राय करू शकता.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
March 24, 2024 10:05 AM IST