होळीच्या हानिकारक रंगांपासून त्वचेची काळजी कशी घ्यावी? तज्ज्ञांनी सांगितला रामबाण उपाय
- Published by:News18 Marathi
Last Updated:
होळीच्या रंगांमध्ये अनेक हानिकारक रसायने असतात. ज्यामुळे त्वचेला हानी पोहोचते.
अमिता शिंदे, प्रतिनिधी
वर्धा : रंगांचा सण म्हणजे होळी. हा रंगांचा सण लोक एकत्र साजरा करतात. यावेळी एकमेकांना रंग लावले जातात. मात्र, होळीच्या रंगांमध्ये अनेक हानिकारक रसायने असतात. ज्यामुळे त्वचेला हानी पोहोचते. त्यामुळे त्वचा खराब होऊ शकते. यासाठी केमिकलयुक्त रंगांपासून आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यावी? विशेषतः धुलीवंदनाच्या दिवशी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत? यासंदर्भात वर्धा येथील आयुर्वेदाचार्या- सौंदर्य तज्ज्ञ डॉ. प्रीती राऊत यांनी माहिती दिली आहे.
advertisement
कोणते रंग खेळावेत?
होळीचे रंग हे हानिकारक असतात. त्यामध्ये अनेक प्रकारचे केमिकल्स वापरले जातात. त्यामुळे हे रंग आपल्या त्वचेवर लागल्याने त्वचेला खाज सुटणे, पुरळ येणे, लाल होणे, इचिंग होणे अशा प्रकारचे रिअॅक्शन दिसू शकतात. त्यामुळे जर तुमची त्वचा खूप जास्त सेन्सिटिव्ह असेल तर शक्यतो नैसर्गिक घटकांनी बनलेलेच रंग तुम्ही वापरा. केमिकलयुक्त रंग खेळू नका. सेन्सिटिव्ह त्वचेवर हानिकारक रंग खेळल्यास, त्वचा जळजळ होणे, पुरळ येणे, इतर रिअॅक्शन होणे, तसेच पिंपल्सचा त्रास वाढू शकतो. स्किनमधले मेलॅनोसाईट्स जे आहेत ते मेलॅलीन पिगमेंट तयार करते ते एक्साईट होऊन हायपर पिगमेंटेशन चाही त्रास होऊ शकतो.
advertisement
रंग खेळण्याआधी घ्या काळजी
केमिकलयुक्त रंगांमुळे स्किन डॅमेज थांबवण्यासाठी, स्किन प्रोटेक्ट ठेवण्यासाठी शक्यतो नैसर्गिक रंग वापरा. होळीचे रंग खेळण्याआधी अँटिऑक्सिडंट जेल लावा. त्यावर वॉटर रेजिस्टंट सनस्क्रीन लावा, जेणेकरून त्वचेवर पाणी पडल्यास सनस्क्रीन निघून जाणार नाही. आणि स्किनला प्रॉपर प्रोटेक्शन देतील.
advertisement
रंग खेळल्यावर काय करावं?
रंग खेळून घरी आल्यानंतर सर्वात प्रथम पाण्याने चेहरा आणि सर्व त्वचा चांगली स्वच्छ करायची आहे. त्यानंतर एखादी चांगलं हायड्रेटिंग फेसवॉश किंवा बॉडीवॉश वापरून त्वचेवरील पूर्ण रंग साफ करायचा आहे. त्यानंतर एखादी हायड्रेटिंग मॉइश्चरायझर किंवा अँटी ऑक्सिडडेंट जेल लाऊन घ्या. त्यावर परत एखादी हायड्रेटींग सनस्क्रीन लावून घ्या. अशाप्रकारे तुमची त्वचेची काळजी तुम्ही घेऊ शकता. ही काळजी घेतल्यानंतर देखील तुमच्या त्वचेवर जर रंगांची रिअॅक्शन दिसत असेल तर त्वचारोग तज्ज्ञांशी संपर्क साधा,असं डॉ. प्रीती राऊत यांनी सांगितलं.
advertisement
होलिका दहन का करतात? जाणून घ्या होळी पूजनाची योग्य पद्धत, Video
होळी खेळण्यापूर्वी तुम्ही एलोवेरा जेल चेहऱ्यावर लावू शकता. याशिवाय मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावायला विसरू नका. शक्यतो आपण खेळत असलेले रंग हे 100 टक्के नॅचरल आहेत याची खात्री करून घ्या. अशाप्रकारे आपण होळीच्या दिवशी हानिकारक केमीकलयुक्त रंगांपासून त्वचेची काळजी घेऊ शकतो,असंही डॉ. प्रीती राऊत यांनी सांगितलं.
Location :
Wardha,Wardha,Maharashtra
First Published :
March 23, 2024 2:40 PM IST
मराठी बातम्या/हेल्थ/
होळीच्या हानिकारक रंगांपासून त्वचेची काळजी कशी घ्यावी? तज्ज्ञांनी सांगितला रामबाण उपाय