चहा मसाला पावडर बनवण्यासाठी साहित्य
- ¼ कप हिरवी वेलची (छोटी वेलची)
- 5-6 काळी वेलची (मोठी वेलची)
- 2 चमचे बडीशेप
- 2 चमचे काळी मिरी
- 1 चमचा लवंग
- 2 दालचिनीचे तुकडे (तीन इंच)
- 1 जायफळ
- 2 छोटे तुकडे सुंठ (सोंठ)
- 1 चक्रफूल (स्टार anise)
चहा मसाला पावडर बनवण्याची पद्धत : गॅसवर तवा ठेवा आणि आच कमी करा. आता त्यात सर्व मसाले टाका आणि 2-3 मिनिटे कमी आचेवर भाजून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये टाकून पावडर बनवा. ही पावडर हवाबंद डब्यात भरून ठेवा आणि जेव्हा गरज असेल तेव्हा वापरा.
advertisement
मसाला चहा बनवण्यासाठी साहित्य
- 2 कप पाणी
- 1 चमचा चहाची पत्ती
- 2 चमचे साखर
- ¾ कप दूध
- ½ चमचा तयार चहा मसाला
मसाला चहा बनवण्याची पद्धत : एका भांड्यात 2 कप पाणी गरम करा. पाणी गरम झाल्यावर त्यात 1 चमचा चहाची पत्ती आणि चवीनुसार साखर टाका. ते गरम झाल्यावर त्यात दूध टाका. एक-दोन उकळी आल्यावर त्यात चहा मसाला टाका. 2-3 मिनिटे उकळा. दोन उकळी आल्यावर गॅस बंद करा आणि झाकण ठेवून 1 मिनिट तसेच ठेवा. गरम चहा गाळून घ्या आणि या चवदार चहाचा आनंद घ्या.
मसाला चहाचे फायदे : मसाला चहा केवळ चवदारच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. त्यात असलेले वेलची, दालचिनी आणि आले पचनक्रिया निरोगी ठेवतात, तर काळी मिरी आणि लवंग सर्दी आणि खोकल्यापासून आराम देतात. म्हणून आजच हा मसाला बनवा.
हे ही वाचा : तुमचं मूल सर्दी-खोकल्याने त्रस्त आहे? तर ही घरगुती पावडर देते त्वरीत आराम, कशी तयार कराल?