जालना: किशोरवयीन मुली वयात येत असताना शरीरामध्ये अनेक बदल होत असतात. या बदलांशी जुळवून घेताना मुलींबरोबर त्यांच्या पालकांचीही तारेवरची कसरत होते. योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे अनेक मुली नैराश्यात जातात काही जणी आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल देखील उचलतात. या मुलींचे योग्य समुपदेशन, आरोग्य तपासणी आणि उपचार होणं अत्यंत गरजेचं असतं. याच बाबीवर मीरा-भाईंदर येथील ‘मेकिंग द डिफरन्स’ ही संस्था मागील तीन वर्षांपासून काम करत आहे. जालना जिल्ह्यात केलेल्या तब्बल 1 हजार मुलींच्या सर्वेक्षणात 300 मुलींमध्ये (anemic deficiency) पोषणतत्वांची कमतरता असल्याचं पाहायला मिळालं. यामुळे विशेषत्वाने जालना जिल्ह्यामध्ये ही संस्था काम करत आहे. याबाबतच लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
मागील तीन वर्षांपासून मेकिंग द डिफरन्स आणि इंटराइज या दोन संस्थांच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सहावी, सातवी आणि आठवीच्या मुलींमध्ये आरोग्य तपासणी घेऊन त्यांच्यामध्ये आढळलेल्या त्रुटींवर मात करण्याची प्रयत्न केले जात आहेत. त्याचबरोबर मुलींचं योग्य प्रकारे कौन्सिलिंग देखील केलं जात आहे. यामुळे किशोर वयातील मुली संकोच न करता आपल्या समस्या सांगतात व त्यावर उपाय शोधले जातात.
रिंकू राजगुरू होणार महाडिकांची सून? धनंजय महाडिकांच्या 'त्या' वक्तव्याची चर्चा Video
शाळेतील विद्यार्थिनींची तपासणी
ज्या मुलींच्या शरीरात पोषण तत्वांची कमतरता आहे, अशा मुलींना फॉलिक ऍसिडच्या टॅबलेट तसेच न्यूट्रिशन किट देखील उपलब्ध करून दिली जाते. जालना जिल्ह्यातील शेलगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील तब्बल 110 विद्यार्थिनींची बुधवारी आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच त्यांच्या समस्यांचे निदान आणि निराकरण करण्यात आलं.
मुलींसाठी मोठं काम
“हे काम केवळ आजच नव्हे तर मागील तीन वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. मुलींना बोलण्यासही संकोच असलेल्या विषयावर त्यांना मार्गदर्शन केलं जातं. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी केली जाते. योग्य निदान करणे व या समस्यांवर उपाय करण्याचं काम देखील केलं जातं,” असं जालना छत्रपती संभाजी नगर टोलवेजचे प्रोजेक्ट हेड यतेंद्र कुमार पांडे यांनी सांगितलं. तर ग्रामीण भागातील मुलींमध्ये अवेअरनेस करणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे, आरोग्य तपासणीच्या माध्यमातून समस्यांचे निदान करणे, त्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपाय करण्याचे काम करत असल्याचं प्रतिनिधी सुषमा राऊत यांनी सांगितलं





