योग्य पद्धतीने स्क्रबिंग करा
- डेड स्किन काढण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे स्क्रबिंग.
- घरच्या घरी स्क्रब तयार करा. यासाठी 1 चमचा तांदळाचं पीठ + 1 चमचा दही + थोडं मध मिसळून पेस्ट तयार करा.
- ही पेस्ट चेहऱ्यावर हलक्या हाताने लावून 2-3 मिनिटे मसाज करा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.
advertisement
- यामुळे डेड स्किन निघून जातेच, शिवाय त्वचेला पोषणही मिळतं.
ओट्स आणि दुधाचा पॅक
- ओट्समध्ये नैसर्गिक एक्सफोलिएटिंग गुणधर्म असतात.
- 2 चमचे ओट्स दुधात भिजवून त्याची पेस्ट तयार करा.
- ही पेस्ट चेहऱ्यावर लावून 10 मिनिटांनंतर हलक्या हाताने चोळत स्वच्छ करा.
- हा पॅक डेड स्किन काढण्यासोबतच त्वचेला मॉइश्चराइजही करतो.
मध आणि लिंबूची कमाल
- मध त्वचेला हायड्रेट करतो तर लिंबू डेड सेल्स काढण्यास मदत करतं.
- 1 चमचा मधात लिंबाचे काही थेंब मिसळा.
- ही पेस्ट चेहऱ्यावर लावून 5 मिनिटांनंतर हलक्या हाताने मसाज करा आणि धुवा.
- या उपायामुळे चेहरा ग्लोइंग दिसतो.
स्टीम घ्या
- स्टीम घेतल्याने त्वचेचे पोअर्स उघडतात आणि डेड स्किन सहज निघून जाते.
- एका भांड्यात गरम पाणी घ्या आणि चेहऱ्याला ५ मिनिटे स्टीम द्या.
- यानंतर हलकं स्क्रबिंग करा.
- ही पद्धत त्वचेला डीप क्लिन करते.
मॉइश्चराइज करायला विसरू नका
- डेड स्किन काढल्यानंतर त्वचेला मॉइश्चराइज करणं खूप महत्त्वाचं आहे.
- यासाठी अॅलोवेरा जेल किंवा नारळाचं तेल वापरा.
- यामुळे त्वचा मऊ आणि हायड्रेटेड राहते.
काही महत्त्वाच्या टिप्स
- आठवड्यातून 1 ते 2 वेळाच स्क्रबिंग करा.
- खूप जास्त रगडणं टाळा, अन्यथा त्वचेवर रॅशेस येऊ शकतात.
- हिवाळ्यात हायड्रेशन टिकवण्यासाठी पुरेसं पाणी प्या.
चेहऱ्यावरची डेड स्किन काढणं काही अवघड नाही. फक्त योग्य पद्धती वापरा आणि नियमित काळजी घ्या. वर दिलेले घरगुती उपाय तुमची त्वचा मऊ, ग्लोइंग आणि निरोगी बनवतील.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
