त्वचा चमकदार दिसण्यासाठी, घरी अगदी सोप्या गोष्टी वापरल्या जाऊ शकतात, ज्यामुळे त्वचेला नैसर्गिकरित्या ताजेपणा आणि चमक मिळेल. यासाठी जाणून घेऊया, एका पर्यायाबद्दल. यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होईल आणि त्वचेवर नैसर्गिक चमक येईल.
Blackheads : ब्लॅकहेड्स काढण्यासाठी हे उपाय नक्की करुन बघा, चेहरा दिसेल स्वच्छ
या फेशियलसाठी लागणारं साहित्य घरी सहज उपलब्ध आहे. हे फेशियल तयार करण्यासाठी तुम्हाला दोन चमचे तांदळाचं पीठ, एक चमचा कोरफडीचं जेल आणि एक चमचा गुलाबजल आवश्यक आहे. तांदळाच्या पिठामधे त्वचेवरची धूळ आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्याची क्षमता असते. कोरफड जेलमुळे त्वचा शांत राहते आणि मॉइश्चरायझ होते. गुलाबपाण्यामुळे हे मिश्रण मऊ होतं, ज्यामुळे त्वचा मऊ आणि सुगंधित होते.
advertisement
स्क्रबिंगनं सुरुवात करा - कोमट पाण्यानं चेहरा धुतल्यानंतर, एक चमचा तांदळाचं पीठ आणि कोरफडीचा गरमिसळा आणि हलक्या हातानं मालिश करा. हे नैसर्गिक स्क्रब मृत त्वचेच्या पेशी काढून टाकते, यामुळे त्वचेवर साचलेलं तेल आणि अस्वच्छ छिद्रं साफ करणं सोपं जातं. नियमित स्क्रबिंगमुळे ब्लॅकहेड्स आणि टॅनिंग कमी होण्यास मदत होते.
Healthy Habits : रोजच्या सवयी करतील मेंदू कमजोर, धोका ओळखा आताच अलर्ट व्हा
फेस पॅक लावा - स्क्रब केल्यानंतर, उरलेलं मिश्रण गुलाबपाण्यात मिसळून एक गुळगुळीत पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर समान रीतीनं लावा. पंधरा - वीस मिनिटं तसंच राहू द्या आणि नंतर थंड पाण्यानं धुवा. या फेसपॅकमुळे त्वचेला पोषण मिळतं, तेलकटपणा कमी होतो आणि यामुळे चेहऱ्यावर चमक येते.
ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मॉइश्चरायझिंग - फेसपॅक काढल्यानंतर, त्वचा थोडी कोरडी वाटू शकते. म्हणून, थोडं मॉइश्चरायझर किंवा थोडासा कोरफडीचा गर पुन्हा लावणं महत्वाचं आहे. यामुळे त्वचा हायड्रेटेड राहील, कोरडेपणा टाळता येईल आणि दिवसभर तुमचा चेहरा मऊ आणि चमकदार राहील.
