TRENDING:

खोकल्यावर रामबाण मध! शुद्ध आहे की भेसळयुक्त, ओळखायचं कसं?

Last Updated:

मधात भरपूर प्रमाणात पोषक तत्त्व, खनिजं आणि जीवनसत्त्व असतात. त्यांचा फायदा मिळवण्यासाठी शुद्ध मध खाणं अनिवार्य आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विनय अग्निहोत्री, प्रतिनिधी
चमचाभर मधात जवळपास 64 कॅलरी आणि 17 ग्रॅम शुगर असते.
चमचाभर मधात जवळपास 64 कॅलरी आणि 17 ग्रॅम शुगर असते.
advertisement

भोपाळ, 6 डिसेंबर : आयुर्वेदात प्राचीन काळापासून मधाचा वापर केला जातो. मधमाशांद्वारे फुलांमधून काढला जाणारा हा गोड, चिकट पदार्थ विविध आजारांवर अत्यंत गुणकारी असतो.

आयुर्वेद विशेषज्ज्ञ डॉक्टर सौरभ सिंह राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, नुसतं मध खाल्लं किंवा एखाद्या पदार्थात मध घालून खाल्लं तरी त्याचा आरोग्याला विशेष फायदा होतो. फक्त मध खाण्यापूर्वी ते शुद्ध आहे की त्यात इतर कोणत्या पदार्थांची भेसळ आहे, याची खात्री करून घ्या. कारण भेसळयुक्त मध खाल्ल्यास ते शरिरासाठी हानीकारक ठरू शकतं.

advertisement

तापापासून कावीळवर रामबाण! मानवासह पशू-पक्ष्यांसाठीही वरदान ही वनस्पती

शुद्ध मध जाडसर असतं. पाण्यात घातल्यावर ते सहजरित्या मिसळत नाही, तर तळाशी जाऊन एकत्र होतं. याउलट भेसळयुक्त मध अगदी सहजपणे पाण्यात मिसळतं. मधात भरपूर प्रमाणात पोषक तत्त्व, खनिजं आणि जीवनसत्त्व असतात. त्यांचा फायदा मिळवण्यासाठी शुद्ध मध खाणं अनिवार्य आहे.

एकही दिसणार नाही डाग, चेहरा छान चमकेल; अशी लावून बघा हळद!

advertisement

मधात प्रामुख्याने फ्रक्टोज असतं. यात कार्बोहायड्रेट, रायबोफ्लेविन, नायसिन, जीवनसत्त्व बी-6, सी आणि ऍमिनो ऍसिड आढळतं. चमचाभर मधात जवळपास 64 कॅलरी आणि 17 ग्रॅम शुगर (फ्रक्टोज, ग्लुकोज, सुक्रोज, माल्टोज) असते. तर, मधात फॅट, फायबर आणि प्रोटीन अजिबात नसतात.

खोकल्यावर मिळतो झटक्यात आराम

खोकल्यावर आराम मिळवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात चमचाभर मध मिसळून पिण्याचा सल्ला दिला जातो. शिवाय आलं आणि मध घातलेलं पाणी प्यायल्यासही खोकला बरा होतो. त्याचबरोबर मधामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. शरिरावर कुठेही सूज किंवा जखम असल्यास त्यावरदेखील आराम मिळतो.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
खोकल्यावर रामबाण मध! शुद्ध आहे की भेसळयुक्त, ओळखायचं कसं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल