एकही दिसणार नाही डाग, चेहरा छान चमकेल; अशी लावून बघा हळद!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
हळद अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणांनी परिपूर्ण असते. त्वचारोगांपासून मधुमेह बरा करण्यासाठी ती गुणकारी ठरते.
आशिष कुमार, प्रतिनिधी
पश्चिम चम्पारण, 4 नोव्हेंबर : स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या पदार्थांमध्ये हळदीचा समावेश होतो. तिचं प्रमाण अगदी नेमकंच असावं लागतं. हळदीचं प्रमाण कमी पडलं तर जेवण बेचव होतं. जास्त झालं तर जेवण कडवट लागतं. म्हणूनच तिचं प्रमाण अतिशय महत्त्वाचं असतं. शिवाय शरिरावर कोणतीही जखम होताच आपण त्याठिकाणी हळद लावतो. त्यामुळे जखम लवकर भरते.
advertisement
आयुर्वेद तज्ज्ञ भुवनेश पांडे यांनी हळदीला सुपर हेल्थी मसाला म्हटलंय. कारण ती अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणांनी परिपूर्ण असते. त्वचारोगांपासून मधुमेह बरा करण्यासाठी हळद गुणकारी ठरते.
आयुर्वेद तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुमेहाचा त्रास असलेल्या व्यक्तींना सतत लघवी होते. यावर उपाय म्हणून चमचाभर वाटलेली हळद पाण्यात घालून प्यावी. यामुळे आराम मिळतो. शिवाय 8 ग्रॅम वाटलेली हळद दररोज दिवसातून दोनवेळा प्यायल्यास सतत लघवी होणं आणि सतत तहान लागण्यावर हळूहळू आराम मिळतो.
advertisement
आपण त्वचारोगाने हैराण असाल तर हळद वाटून तिळाच्या तेलात मिसळून त्याने मसाज करावी. त्यामुळे त्वचारोगांपासून मुक्ती मिळते. शिवाय कच्च्या दुधात वाटलेली हळद मिसळून मसाज केल्यास त्वचा मुलायम होते. यामुळे थंडीतून हाता-पायांना भेगाही पडत नाहीत. तर, 10 ग्रॅम हळदीत तीळ वाटून ते पाण्यात मिसळून रात्री चेहऱ्याला लावावं आणि सकाळी गरम पाण्याने चेहरा धुवावा. यामुळे चेहऱ्यावरील वांग दूर होतात आणि चेहरा छान चमकदार दिसतो.
advertisement
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g
Location :
Bihar
First Published :
December 04, 2023 10:25 PM IST