जयपूर: काळे मीठ आपल्या स्वयंपाकघरातील महत्वाचा घटक आहे. याचा वापर फक्त स्वयंपाकातच नाही तर पारंपरिक औषधांमध्येही केला जातो. विशेषतः चटणी, चाट, कोशिंबीर अशा पदार्थांमध्ये काळ्या मीठाचा उपयोग केला जातो. या मिठाचा रंग तपकिरी-काळा असतो आणि त्याची चव खारट तर असतेच पण सौम्य गोडसरही असते. पण हे काळे मीठ कसे तयार होते माहीत आहे का?
advertisement
काळे मीठ कसे तयार होते?
काळे मीठ म्हणजे Rock Salt किंवा खडे मीठाचाच एक प्रकार आहे. खडे मीठ खनिज आहे. ते खडकांपासून मिळते. पण त्यापासून काळे मीठ तयार करणे कठीण प्रक्रिया आहे. कोळशाच्या भट्टीत जोरदार आग लावून त्यात मातीच्या भांड्यात पांढरे मीठ शेजारी शेजारी माठ रचून ठेवले जाते. पांढऱ्या मिठासोबत माठात बदामाच्या साली ठेवल्या जातात. या सालींमुळे मिठाचा रंग बदलतो आणि ते काळे करडे मीठ बनते. मातीची भांडी किंवा माठ 24 तास भट्टीत ठेवल्यानंतर बाहेर काढून थंड केले जातात. त्यानंतर त्यातून मिठाचे गोळे बाहेर काढले जातात.
काळे मीठ खाण्याचे फायदे:
पचन सुधारते: काळे मीठ पचनशक्ती वाढवते, ज्यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात.
हायड्रेशनमध्ये मदत: हे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवते, ज्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते.
वजन नियंत्रण: काळे मीठ पचन सुधारतं, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
डोळ्यांसाठी फायदेशीर: यात असलेले खनिज घटक डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
दुर्गंधी कमी करते: तोंडाची दुर्गंधी कमी करते आणि विषारी पदार्थ शरीरातून बाहेर काढण्यास मदत करते.