TRENDING:

भारतात जंक फूड आहे पिझ्झा, मग इटलीत लोक तो दररोज खाऊनही हेल्दी कसे राहतात?

Last Updated:

Pizza Facts : भारतात जो पिझ्झा जंक फूडच्या यादीत आहे. तो मूळचा इटालियन पदार्थ, जो इटलीतील लोक दररोज खातात पण तो त्यांच्यासाठी हेल्दी आहे. हा पिझ्झा खाऊन इटालियन हेल्दी राहतात, हे कसं काय?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : पिझ्झा म्हणताच कित्येकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. पिझ्झा खावासा वाटला असेल. पण दररोज पिझ्झा खाणं चांगलं नाही. भारतात तो जंक फूडच्या यादीत आहे. जंकफूड असल्याने पिझ्झा खाल्ला की अनेकांना त्रास होतो, लठ्ठपणाची समस्या बळावते. पण  खरंतर हा इटालियन पदार्थ इटलीतील लोक दररोज खातात. तरी ते लोक हेल्दी, फिट राहतात. हे कसं काय?
News18
News18
advertisement

पिझ्झा म्हणजे त्यावर कांदा, टोमॅटो, शिमला मिरजी, कॉर्न, मशरूम अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात. तरी भारतात पिझ्झा हा जंक फूडच्या यादीत आहे. जंक फूड म्हणजे असे पदार्थ जे खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या उद्धभवतात. लठ्ठपणा बळावतो. त्यामुळे भारतात दररोज पिझ्झा खाणाऱ्या लोकांना समस्या होतात. पण भारतातील लोकांना नुकसान पोहोचवणारा पिझ्झा खाऊन इटलीतील लोकांना काहीच कसं होत नाही? गट हेल्थ कोच डिम्पल जांगडा यांनी एका वेबसाईटला याबाबत माहिती दिली आहे.

advertisement

कंटेट क्रिएटर्स, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं भयानक भविष्य, PHOTO पाहूनच हादराल

याचं कारण म्हणजे पिझ्झा बनवण्याची पद्धत. इटलीत पिझ्झा बनवण्याची पद्धत भारताच्या पद्धतीपेक्षा वेगळी आहे. भारतात मिळणारा पिझ्झा इटलीतील पिझ्झासारखा नसतो. आता दोन्ही देशांतील पिझ्झामध्ये नेमका फरक काय?

पिझ्झा बेस : इटलीत पिझ्झा बेस धान्यांच्या पिठापासून बनवतात आणि दररोज ताजं हातांनी बनवला जातो. जे आतड्यांतील मायक्रोबायोमसाठी चांगलं असतं. तर भारतात पिझ्झा बेस पाकिटात मिळतात. जे मैद्यापाून बनलेले असतात. मैदात कोणतेच पोषक घटक नसतात तसंच या कित्येक केमिकल्स आणि ब्लीचिंग एजेंट्स मिसळले जातात.

advertisement

चीझचा वापर : इटलीत पिझ्झावर टाकलं जाणारं चीझ घरी बनवलेलं ताजं चीझ असतं. भारतात बहुधा प्रोसेस्ड चीझचा वापर होतो. ज्यात प्रिझर्व्हेटिव्स मिक्स केले जातात. हे प्रिझर्व्हेटिव्ह शरीरात सूज आणि लठ्ठपणा वाढवतात.

Heart Attack : माणसांसारखा प्राण्यांनाही हार्ट अटॅक येतो का? त्यांनाही हृदयाच्या समस्या असतात का?

टॉपिंग्स आणि सॉस : इटलीतील पिझ्झामध्ये ऑलिव्ह ऑईल, ओरिगॅनो आणि चिलीफ्लेक्स वापरतात जे पचनासाठी फायदेशीर आहे. भारतात पिझ्झा बेसवर मेयोनीज, बटर, पॅक्ड सॉस टाकले जातात जे आरोग्यासाठी चांगले नाहीत.

advertisement

लाइफस्टाईल : इटालियन लोक शारीरिकरित्या सक्रिट असतात. पण आपण पिझ्झा खाल्ल्यानंतर निष्क्रिय होतो, हे लठ्ठपणाचं एक कारण आहे.

हेल्दी पिझ्झा कसा बनवायचा?

पिझ्झा बेस घरीच बनवा. मैद्याऐवजी ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा मका यासारख्या धान्यांचा वापर करून घरीच बनवा. यामुळे पोषणही मिळेल आणि वजन घटवण्यातही मदत होईल. चीझही ताजं घरी बनवलेलं वापरा. ताज्या भाज्या वापरा.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
भारतात जंक फूड आहे पिझ्झा, मग इटलीत लोक तो दररोज खाऊनही हेल्दी कसे राहतात?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल