TRENDING:

महागडं केशरही असू शकतं बनावट, पण ओळखणं इतकंही नाही कठीण!

Last Updated:

1 किलो केशरची किंमत जवळपास 3 लाखांपर्यंत असते. तर, केशराची लहानशी डबीदेखील शेकडो रुपयांना मिळते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पीयूष शर्मा, प्रतिनिधी
किंमतीने केशर सर्वांनाच परवडणारं नसतं.
किंमतीने केशर सर्वांनाच परवडणारं नसतं.
advertisement

मुरादाबाद, 15 डिसेंबर : नुसतं एक, दोन घातलं तरी पदार्थाचा रंग बदलतो आणि चवही बदलते. केशरामुळे एखादा पदार्थ खरोखर आकर्षक होतो. मग तो गोडाचा पदार्थ असला किंवा नॉनव्हेज बिर्याणी असली तरीही. म्हणूनच किंमतीने केशर सर्वांनाच परवडणारं नसतं.

1 किलो केशरची किंमत जवळपास 3 लाखांपर्यंत असते. तर, केशराची लहानशी डबीदेखील शेकडो रुपयांना मिळते. परंतु एवढं महाग असलं, तरीही केशर दरवेळी शुद्धच असतं असं नाही, तर ते भेसळयुक्तदेखील असू शकतं. त्यामुळे शुद्ध आणि भेसळयुक्त केशरातला फरक कसा ओळखायचा पाहूया.

advertisement

देशी पिझ्झाच भारी! पुरुषांची वाढवतो ताकद, शुक्राणूंची संख्या वाढते झटपट

केशर पाण्यात घालून त्याचे कण घासल्यास ते पाण्यात सहज मिसळतात. असं झाल्यास समजून जावं की, हे शुद्ध केशर आहे. तर, याउलट केशराचे कण पाण्यात व्यवस्थितपणे मिसळले नाहीत, तर ते भेसळयुक्त केशर असतं किंवा चांगल्या दर्जाचं नसतं.

थंडीत वाटत नाही घराबाहेर पडावसं; डायटमध्ये करा 'या' पदार्थांचा समावेश, राहाल तंदुरुस्त!

advertisement

भारतात मोठ्या प्रमाणात केशराचं उत्पादन घेतलं जातं. छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात हे उत्पादन घेतलं जातं. केशर आरोग्यासाठी प्रचंड उपयुक्त असतं. केशराचं दूध प्यायल्यास चांगली गाढ झोप लागते. हाडं मजबूत होतात. शिवाय केशरात कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि मॅगनीज मोठ्या प्रमाणात असतं. शिवाय केशरात पाचक गुणधर्म असल्याने त्यामुळे पोटाच्या समस्याही दूर होतात.

advertisement

लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
महागडं केशरही असू शकतं बनावट, पण ओळखणं इतकंही नाही कठीण!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल