TRENDING:

Coconut Oil : घरीच बनवा शुद्ध नारळाचं तेल! मशीनची गरज नाही, लागतील फक्त नारळ आणि थोडासा वेळ

Last Updated:

Making Coconut Oil At Home : तुम्ही घराच्या घरी सहज अगदी कमी मेहनतीत नारळाचं तेल बनवू शकता. महत्त्वाचं म्हणजे हे नारळाचं तेल बनवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही महागड्या मशीनची गरज पडत नाही. साध्या मिक्सरचा वापर करून तुम्ही हे तेल बनवू शकता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आपल्याकडे नारळाचं तेल किंवा त्याला काही लोक खोबऱ्याचं तेलही म्हणतात. हे जवळपास प्रत्येक घरामध्ये वापरलं जातं. केसांना लावण्यासाठी, स्वयंपाकात वापरण्यासाठी नारळाचं तेल आपल्याला लागतं. बाजारात अनेक प्रकारचे नारळाचे ऑइल मिळते. पण ते सर्वच शुद्ध असतात असे नाही. अशावेळी जर तुम्हाला तुमच्या घरीच अगदी सोप्या पद्धतीने नारळाचं तेल बनवता आलं तर..?
घरी नारळ तेल कसे बनवायचे?
घरी नारळ तेल कसे बनवायचे?
advertisement

होय, तुम्ही घराच्या घरी सहज अगदी कमी मेहनतीत नारळाचं तेल बनवू शकता. महत्त्वाचं म्हणजे हे नारळाचं तेल बनवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही महागड्या मशीनची गरज पडत नाही. साध्या मिक्सरचा वापर करून तुम्ही हे तेल बनवू शकता. lifeonroads__ या अकाउंटवरही हे तेल बनवण्याची एक पद्धत सांगितली आहे.

असं बनवा शुद्ध नारळाचं तेल..

advertisement

- सर्वात आधी देवाला अर्पण करण्याचा जो नारळ असतो तो घ्या. तो फोड आणि त्याचे लहान लहान तुकडे करा.

- तुम्ही सुकं खोबरं घेतलं असेल तर ते सुमारे 2 तास पाण्यात भिजवा. यामुळे ते मऊ होईल आणि मिक्सरमध्ये वाटायला सोपे जाईल.

- त्यानंतर जेवढे कप नारळाचे तुकडे त्यात तेवढेच पाणी घाला आणि मिक्सरच्या भांड्यात टाका.

advertisement

- आता मिक्सरला फिरवून हे शक्य तितके बारीक करून घ्या.

- यानंतर हे वाटलेले मिश्रण स्वच्छ कॉटनच्या किंवा मलमलच्या कापडातून गाळून घ्या.

- आता नारळाचे दूध वेगळे होईल आणि वरती चोथा राहील.

- आपल्याला तेल बनवण्यासाठी या नारळाच्या दुधाची गरज आहे.

- आता नारळाचे दूध 15 तास किंवा रात्रभर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. दुसऱ्या दिवशी त्यावर एक जाड क्रीम तुम्हाला दिसेल.

advertisement

- ही क्रीम एका जाड तळाच्या पॅनमध्ये घेऊन गॅसवर ठेवा आणि गरम करा.

- आता लोण्यापासून आपण जसे तूप बनवतो, त्याप्रमाणेच नारळाच्या दुधापासून तेल बनवा.

- तेल क्रीमपासून वेगळे होईपर्यंत आणि हलका तपकिरी रंगाचा अवशेष दिसेपर्यंत गरम करा.

नंतर ते पुन्हा गाळणी, कॉटनचे कापड किंवा मलमलच्या कापडातून गाळून घ्या.

अशाप्रकारे हे शुद्ध नारळाचे तेल तयार होते. याचा वापर तुमच्या केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. महत्त्वाचं म्हणजे हे तेल बनवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही महागड्या मादीची गरज पडत नाही. तुपाप्रमाणे तुम्ही सहज नारळाचे तेलही आता घरीच बनवू शकता.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
होळीला बाहेरचे रंग कशाला, घरीच बनवा केमिकल मुक्त कलर, making चा संपूर्ण Video
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Coconut Oil : घरीच बनवा शुद्ध नारळाचं तेल! मशीनची गरज नाही, लागतील फक्त नारळ आणि थोडासा वेळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल