तुमची कणीक मळायची पद्धत योग्य असेल तर पोळ्या करणं हे काम अगदी सहज हातावेगळं होईल. एका मोठ्या परातीत किंवा पसरट भांड्यात किंचित पाणी, तेल आणि मीठ घेऊन त्यात हवं तेवढं पीठ घ्या. हवं तेवढं पाणी थोडं थोडं घालून कणीक मळा. त्यामुळे तुमची कणीक फार पातळ होणार नाही. कणीक खूप पातळ मळली गेली असेल तर ती पोळपाट लाटण्याला चिकटते. त्यामुळे कणीक मळून झाल्यावर लगेच पोळ्या करु नका. मळलेली कणीक थोडा वेळ मुरायला ठेवा. कणीक हलक्या हाताने मळा. कणकेचा गोळा घेऊन पोळी लाटताना लाटणं सलग फिरवू नका. सतत उचलून लाटणं फिरवा. कणीक खूपच पातळ झाली असेल तर थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवा आणि नंतर पोळ्या लाटा.
advertisement
Kitchen Jugaad : सेफ्टी पिनचा वापर करून काही मिनिटांत कापा ढीगभर कोबी, वापरा ही नवी ट्रिक
कणीक फ्रीजमध्ये ठेवत असाल तर ती थंडगार होणार नाही याची काळजी घ्या. आदल्या दिवशी मळून फ्रीजमध्ये ठेवलेली कणीक पोळ्या करण्यापूर्वी किमान अर्धा तास बाहेर काढून ठेवा. मात्र बाहेर काढलेली कणीक खूप पातळ होण्याआधी पोळ्या करुन घ्या. तुम्ही कितीही चांगली कणीक भिजवली तरी लाटताना पोळी पोळपाट किंवा लावण्यासाठी चिकटत असेल तर ॲल्युमिनिअम फॅाईलची तुम्हाला खूप मदत होऊ शकते. फॅाईलचा एक तुकडा पोळपाटावर पसरुन त्यावर कणकेचा गोळा ठेवून हळूहळू पोळी लाटली तर पोळपाटाला ती चिकटणार नाही. त्यामुळे तुमच्या पोळ्या झटपट होतील.
काही वेळा तुमचं पोळपाट लाटणं चांगलं नसेल तर त्यामुळे कणीक त्याला चिकटू शकते. त्यामुळे चांगलं पोळपाट लाटणं निवडणंही महत्त्वाचं आहे. लाटण्याला थोडं तेल लावलं आणि थोडं थोडं कोरडं पीठ घेऊन पोळी लाटली तरी चिकटण्याचा त्रास होणार नाही आणि पोळ्या करणं हे काम सोपं होईल.