बेकिंग सोडाचा वापर : कपड्यांमधील दुर्गंध दूर करण्यासाठी बेकिंग सोडा उत्तम उपाय आहे. कपड्यांमध्ये बेकिंग सोडा शिंपडा आणि काही तासांसाठी तसेच ठेवा. बेकिंग सोडा वास शोषून घेतो आणि कपड्यांना व्यवस्थित राहतात.
हे ही वाचा : Numerology: या जन्मतारखांची जोडी जुळणं लकी! लग्नानंतर होते चौफेर प्रगती; प्रसिद्धी-पैसा कमावतात
व्हिनेगरचा वापर : व्हिनेगरचा वापर कपड्यांचा वास घालवण्यासोबतच त्यांना शुद्ध देखील करतो. थोडासा व्हिनेगर कोमट पाण्यात घालून कपडे धुतल्यास वास नाहीसा होतो. विशेषतः कमी धुण्याची गरज असणाऱ्या कपड्यांमध्ये व्हिनेगरचा वापर उपयुक्त ठरतो.
advertisement
ओलावा नियंत्रित ठेवा : कपाटातील कपड्यांना येणाऱ्या वासाचे मुख्य कारण ओलावा असू शकतो. ओलावा नियंत्रित करण्यासाठी कपाटात सिलिका जेल किंवा कडूलिंबाची पाने ठेवा. हे ओलावा शोषून घेतात आणि कपडे कोरडे राहतात, ज्यामुळे वास दूर होतो.
हे ही वाचा : Depression : धक्कादायक, देशभरात तब्बल इतके वृद्ध डिप्रेशनचे बळी, डॉक्टरांनी काय सांगितलं?
फ्रेश एअर फ्रेशनरचा वापर करा : कपड्यांमधील दुर्गंध घालवण्यासाठी फ्रेश एअर फ्रेशनर वापरता येईल. कपाटात किंवा कपड्यांवर हलका नैसर्गिक एअर फ्रेशनर स्प्रे करा. यामुळे दुर्गंध दूर होईल.
