TRENDING:

Child Health : Premature बाळाला अधिक जपावं लागतं का? कशी घ्याल त्याची काळजी?

Last Updated:

प्रीमॅच्युअर बाळांचं घरी संगोपन कसं करावं, याबाबत काळजी आणि भीतीचं चित्र दिसून येतं. खरं तर यात अवघड काहीच नसतं. केवळ काही गोष्टी पाळल्या तर अशा बाळांची घरी काळजी घेणं सोपं होऊ शकतं. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलेल्या या टिप्स फॉलो करा.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नियोजित वेळी प्रसूती होणं स्त्रियांसाठी आणि बाळांसाठी हितकारक असतं; मात्र काही प्रसंगी वेळेआधीच प्रसूती होते. अशा बाळांचं घरी संगोपन कसं करावं, याबाबत काळजी आणि भीतीचं चित्र दिसून येतं. खरं तर यात अवघड काहीच नसतं. केवळ काही गोष्टी पाळल्या तर अशा बाळांची घरी काळजी घेणं सोपं होऊ शकतं. बेंगळुरूतल्या कावेरी हॉस्पिटलमधल्या सीनिअर कन्सल्टंट निओनॅटोलॉजिस्ट डॉ. श्रीनाथ मणिकांती यांनी त्याबाबत टिप्स दिल्या आहेत.
Premature बाळाला अधिक जपावं लागतं का? कशी घ्याल त्याची काळजी?
Premature बाळाला अधिक जपावं लागतं का? कशी घ्याल त्याची काळजी?
advertisement

योग्य तापमान : 

वेळेआधी प्रसूती झालेल्या बाळांसाठी त्यांचं आजूबाजूचं वातावरण व्यवस्थित राखणं महत्त्वाचं असतं. बाळाला सुरक्षित व योग्य तापमानात ठेवावं लागतं. त्यासाठी बाळाला जाड कपडे किंवा एकापेक्षा अधिक कपडे घालता येतात. आवश्यक तेव्हा ते काढून टाकले पाहिजेत; मात्र बाळाच्या अंगावर खूप पांघरुणं घालू नका. त्यामुळे तापमान जास्त वाढू शकतं व बाळाला त्रास होऊ शकतो. डिजिटल थर्मामीटर घेऊन त्यानुसार तापमान तपासावं.

advertisement

बाळाच्या झोपेसाठी योग्य वातावरण :

बाळाला झोप लागावी म्हणून थोडंसं थंड तापमान, दिवे बंद करणं, शांतता ठेवणं या गोष्टी कराव्यात. लवकर जन्माला आलेल्या बाळांना रात्रीच्या वेळी जास्त भूक लागते. त्यामुळे त्यांची झोप मोडणार नाही याची काळजी घ्यावी.

सुरक्षितपणे आंघोळ :

आंघोळीचं पाणी गरम न घेता कोमट असावं. केस नुसत्या पाण्यानं धुवावेत. पहिल्या महिन्यात बाळाला शक्यतो कोणतेही विकतचे साबण लावू नयेत. नुसत्या पाण्यानं अंघोळ घालावी. बाळाचं वजन अडीच किलो होत नाही, तोपर्यंत बाळाला नुसतं पुसून घ्यावं. बाळ महिन्याभराचं होत नाही, तोवर कोणतीही लोशन्स, क्रीम्स लावू नयेत.

advertisement

SIDsपासून प्रतिबंध कसा करावा? 

सडन इन्फंट डेथ सिंड्रोम यालाच कॉट डेथ असंही म्हणतात. यात वरवर निरोगी वाटणाऱ्या बाळांचा पहिल्या 6 महिन्यांत झोपेत मृत्यू होतो. वेळेआधी जन्म झालेल्या बाळांना याचा थोडा जास्त धोका असतो. यामागची कारणं अजून नीटशी समजली नसली, तरी त्याला प्रतिबंध करणं शक्य असतं.

- बाळांना पालथं म्हणजे पोटावर झोपवू नये. यामुळे श्वास घेण्यास अडथळे येऊ शकतात. बाळ त्याच्या मनानंच पालथं झालं तर काही हरकत नसते. पाठीवर झोपल्याने श्वास सहज घेता येतो व शरीराचं तापमान जास्त वाढत नाही. तापमान वाढणं हे SIDsचं प्रमुख कारण असतं.

advertisement

- एका कुशीवर झोपणं हेही फारसं हितकारक नसतं. यामुळे तर SIDचा धोका वाढतो.

Health Tips : फॅटी लिव्हरकडे दुर्लक्ष करणं बेतू शकत जीवावर, उद्भवेल हार्ट अटॅक, कँसरचा धोका

- बाळ मोठं होईपर्य़ंत अंथरुणावर खेळणी, उश्या, पांघरुणं ठेवू नयेत. याचा अतिरेकी वापर झाल्यास बाळाला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

- आई-बाबा अशा दोघांमध्ये बाळाला झोपवत असाल, तर बाळाच्या अंगावर वजन येण्याची, बाळ गुदमरण्याची शक्यता असते.

advertisement

- बाळाला जितकं जास्त स्तनपान करता येईल, तितकं करा. कारण स्तनपान केलेली बाळं झोपेतून सहजपणे उठतात; पण फॉर्म्युला दुधावर असलेली बाळं तुलनेनं गाढ झोपतात. स्तनपान सुरू असलेल्या बाळांना म्हणूनच SIDsचा धोका कमी असतो. स्तनपान सुरू असताना स्त्रियांनी धूम्रपान, मद्यपान करू नये. यानेही SIDs चा धोका वाढतो.

सार्वजनिक ठिकाणं टाळावीत :

वेळेआधी जन्माला आलेल्या बाळांना संसर्गाचा धोका जास्त असतो. त्यामुळे गर्दी असलेल्या जागा, सार्वजनिक ठिकाणं टाळावीत. तसंच घरीही खूप पाहुण्यांना आमंत्रित करू नये. बाळाला स्पर्श करण्याआधी प्रत्येकाला हात साबणानं स्वच्छ धुवायला लावावेत.

कांगारू केअर :

ऊबदार खोलीमध्ये बाळाला केवळ डायपर घालून तुमच्या छातीवर ठेवा. बाळाची मान एका बाजूला करा. अशा प्रकारे स्पर्शातून बाळासोबतचं नातं दृढ होतं. स्तनपान वाढण्यासाठी मदत होते. जितके जास्त जमतील तितके प्रयत्न यासाठी करा. यामुळे बाळाच्या हृदयाचे ठोके व श्वासाची गती संतुलित होण्यास मदत होते. ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. शरीराचं तापमान नियंत्रित राहतं व बाळाची वाढ होते. संशोधनावरून हे सिद्ध झालं आहे.

आपत्तीसाठी तयार राहा :

NICUमध्ये दाखल असलेल्या बाळांना सामान्य बाळांपेक्षा पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच अशा परिस्थितीसाठी पालकांनी तयार असलं पाहिजे. घराजवळच्या चांगल्या रुग्णालयाची माहिती घेऊन ठेवली पाहिजे. रुग्णवाहिकेचा संपर्क क्रमांक घेऊ ठेवला पाहिजे. NICU चा संपर्क क्रमांक सल्ल्यासाठी सेव्ह करून ठेवावा. तिथून निघण्याआधी बाळाच्या बेसिक लाइफ सपोर्टसाठी प्रशिक्षण घेणं गरजेचं असतं.

वेळेआधी जन्म झालेल्या बाळांची छोट्या छोट्या गोष्टींद्वारे काळजी घेता येऊ शकते. अशा प्रकारे प्रतिबंधात्मक उपाय करून या बाळांना असलेला धोकाही टाळता येऊ शकतो.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Child Health : Premature बाळाला अधिक जपावं लागतं का? कशी घ्याल त्याची काळजी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल