हिवाळ्यात मुलांची काळजी कशी घ्यावी ?
थंडीपासून मुलाचं रक्षण करण्यासाठी स्वेटर किंवा थर्मल अशा उबदार कपड्यांचा वापर वाढवा. याशिवाय तुमची मुलं 7 वर्षांपेक्षा मुलं लहान असतील तर त्यांचं लसीकरण झालंय की नाही याची खात्री करून घ्या. त्यापेक्षा जास्त वयांच्या मुलांना डॉक्टरांच्या सल्ल्याने फ्लू व्हॅक्सिन द्यावं. लहान मुलांना सर्दी किंवा खोकला हा 4 दिवसांपेक्षा जास्त असेल तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार करून घ्या नाही तर न्यूमोनिया होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
advertisement
'Winter Special detox drinks थंडीत प्या ‘हे’ ड्रिंक्स; शरीर राहील स्वस्थ, दूर पळतील अनेक आजार'
न्यूमोनियाची लक्षणे कशी ओळखावी ?
जर तुमचा मुलगा जोरजोरात श्वास घेत असेल किंवा त्यांच्या श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्याला त्वरीत डॉक्टरांकडे घेऊन जा. त्यापूर्वी जर मुलाला भूक लागत नसेल, तो दूध पित नसेल , मग त्याला ताबडतोब डॉक्टरकडे घेऊन जा. जर डॉक्टरांनी मुलाला ॲडमिट करण्याचा सल्ला दिला तर ऐका कारण एक लहानशी चूक मोठ्या आजाराला निमंत्रण देऊ शकेल.
'Winter special soups: हिवाळ्यात रमऐवजी प्या हे गरमागरम सूप! मिळेल ताकद, राहाल निरोगी'
संक्रमणापासून रोखा
आपल्या मुलांना साथीच्या आजारापासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्या स्वच्छतेची काळजी घ्या. याशिवाय आपल्या घरातल्या व्यक्तींना सर्दी, खोकल्याचा आजार झाला असेल किंवा मुलांचे मित्र-मैत्रिणींना सर्दी असेल तर तुमच्या मुलांना त्यांच्यापासून दूर ठेवा. अशाने त्यांना संसर्ग होण्याची भीती अधिक असते.