Winter Special detox drinks थंडीत प्या ‘हे’ ड्रिंक्स; शरीर राहील स्वस्थ, दूर पळतील अनेक आजार
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Winter Special detox drinks थंडीत आणि वाढलेल्या प्रदूषणात तुम्हाला आजारी न पडता फिट राहायचं असेल तर आम्ही तुम्हाला काही आरोग्यदायी पेयांची माहिती देणार आहोत, जी तुम्ही घरच्या घरीच करू शकता आणि थंडीत स्वत:च्या आरोग्याची काळजी घेऊ शकता.
Winter Special detox drinks: हिवाळ्यात झालेल्या वातावरण बदलामुळे अनेक जण त्रस्त आहेत. त्यातच प्रदूषणाचा त्रास वाढल्याने अनेकांना साथीच्या आजारांनी ग्रासलेलं आहे. तुम्हाला दमा, अस्थमा किंवा श्वसनाचे अन्य आजार असतील आणि या प्रदूषणात तुम्हाला आजारी न पडता फिट राहायचं असेल तर आम्ही तुम्हाला काही आरोग्यदायी पेयांची माहिती देणार आहोत, जी तुम्ही घरच्या घरीच करू शकता आणि थंडीत स्वत:च्या आरोग्याची काळजी घेऊ शकता.

आलं आणि लिंबूपाणी
प्रत्येक किचनमध्ये सहजपणे उपलब्ध असणारा पदार्थ म्हणजे आलं आणि लिंबू. लिंबात असलेलं व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारशक्ती वाढवते ज्यामुळे संक्रमणाचा त्रास कमी होतो. याशिवाय शरीरातली घातक द्रव्यं लघवीद्वारे पदार्थ काढून टाकण्यास लिंबाचा फायदा होतो. याशिवाय लिंबू आणि आल्याधे अँटी बॅक्टेरियल, आणि अँटी इंफ्लमेटरी गुणधर्म आढळतात. रोज गरम पाण्यात आलं आणि लिंबू उकळून प्यायलास साथीच्या आजारांचा धोका कमी होईल.
advertisement

संत्र्याचा रस
व्हिटॅमिन सी त्याच्या अँटिऑक्सिडंट, अँटी इंफ्लमेंटरी गुणामुळे फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. व्हिटॅमिन सी फुफ्फुसांचे ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करते. त्यामुळे फुफ्फुसांती कार्यक्षमता वाढून साथीच्या रोगांशी लढण्याची शक्ती वाढते. जर तुम्हाला ज्युस प्यायचा नसेल तर तुम्ही संत्री कापून खाऊ शकता.

advertisement
बीटरूट आणि गाजर ज्यूस
बीटरूट आणि गाजरमध्ये पुरेशा प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे फ्री रॅडिकलचा धोका कमी होतो. यकृताचे कार्य सुधारतं आणि यकृताचं वाढतंय. जर तुम्हाला गाजर आणि बीटरूट आवडत असेल तर तुम्ही दोन्ही एकत्र मिक्सरमध्ये वाटून त्यांचा रस पिऊ शकता नाहीतर तुमच्या आवडीप्रमाणे वेगवेगळा ज्यूस प्या.

advertisement
काकडी आणि पुदिन्याचं पाणी
काकडी आणि पुदिन्याचे पाणी एक उत्कृष्ट डिटॉक्स पेय आहे. दोन्ही शरीरातले विषारी पदार्थ बाहेर टाकायला मदत करतात. काकडीमध्ये अँटिऑक्सिडंट असतात, जे फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात, तर पुदीना पाचन तंत्रावर चांगला प्रभाव पाडतो. पुदिन्यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आणि व्हिटॅमिन सी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 26, 2024 8:12 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Winter Special detox drinks थंडीत प्या ‘हे’ ड्रिंक्स; शरीर राहील स्वस्थ, दूर पळतील अनेक आजार