टोमॅटोमध्ये असे अनेक पोषक घटक आढळतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी, फायबर फोलेट आणि कॅल्शियमसारखे अनेक फायदेशीर घटक असतात, जे शरीरात अँटी-ऑक्सिडंट म्हणून काम करतात. त्याचा ज्यूस नियमित प्यायल्यानं अनेक आजार दूर राहतील.
Passion Fruit नव्हे हे आहे पॉवरफुल फ्रूट; BP, शुगरसारख्या आजारांवर रामबाण उपाय
advertisement
टोमॅटो ज्यूस कसं बनवायचं ?
- 2 टोमॅटो, 1 कप पाणी,1 चिमूटभर मीठ घ्या
- सर्वप्रथम टोमॅटो पाण्यानं स्वच्छ धुवा.
- छोटे तुकडे करून ज्युसर जारमध्ये ठेवा.
- ज्युसरच्या भांड्यात एक कप पाणी घालून ४-५ मिनिटं चालवा.
- रस चांगला तयार झाल्यावर एका भांड्यात काढा.
- आता ते एका ग्लासमध्ये काढा आणि वरती मीठ घाला.
- यानंतर तुम्ही ते पिऊ शकता
तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने होतात खूपच फायदे, महत्त्वाची माहिती, VIDEO
टोमॅटोचा ज्यूस पिण्याचे 5 आश्चर्यकारक फायदे
1. टोमॅटो ज्यूसमुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत होते.
2. याचं नियमित सेवन केल्यानं तुम्ही सर्दी-खोकल्यासारख्या समस्यांपासून दूर राहू शकाल.
3. टोमॅटो ज्यूस हाडं मजबूत करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.
4. महिलांनी टोमॅटोचा ज्यूस प्यायल्यानं स्तनांच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.
5. टोमॅटोचा ज्यूस शरीराला ऊर्जा देतो, ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवत नाही.
टॉमेटो ज्यूसमुळे, कर्करोग, मधुमेह आणि त्वचेशी संबंधित समस्यांचा प्रादुर्भाव कमी होतो,तसंच टॅनिंग कमी करण्यासाठीही टॉमेटो उपयुक्त आहे.
