Passion Fruit नव्हे हे आहे पॉवरफुल फ्रूट; BP, शुगरसारख्या आजारांवर रामबाण उपाय
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
Passion Fruit Benefits : हे फळ डायबेटिज,लिव्हर डीसिज आणि उच्च रक्तदाब यासारख्या आजारांपासूनही मुक्त करते.
रॉबिन मॉल
श्रीनगर गढवाल : निरोगी राहण्यासाठी योग्य आहार घेणं गरजेचं आहे. फळं खा, असं सांगण्यात येतं. पण कोणत्या फळाचा तुमच्या आरोग्याला सर्वाधिक फायदा होईल हे माहीत नसतं. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच एका फळाची माहिती घेऊन आलो आहोत. हे फळ खाल्ल्याने डायबेटीस, बीपी, लिव्हर डिसीझसारख्या लाइफस्टाइल आजारांपासून संरक्षण मिळतं. नाव पॅशन फ्रूट असलं तरी खऱ्या अर्थाने हे पॉवरफुल फळ आहे.
advertisement
पॅशन फ्रूटचे फायदे
पॅशन फ्रूट हे एक अतिशय गुणकारी फळ आहे, ज्याला भारतात सामान्य भाषेत कृष्ण फळ असेही म्हणतात. अनोखी चव आणि पोषक तत्वांनी समृद्ध असलेले हे परदेशी फळ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असून[ बाजारात त्याची मागणी नेहमीच असते.
परदेशातही आहे मागणी
फलोत्पादन विभागाचे कृषी तज्ज्ञ ईश्वर सिंग यांनी लोकल 18 ला सांगितले की, हे फळ मूळचे ब्राझील, पॅराग्वे आणि अर्जेंटिनामध्ये आढळते. मात्र, त्याची चव आणि पौष्टिकगुणधर्मामुळे शेतकऱ्यांनी आता ईशान्येकडील मणिपूर, नागालँड, आसाम आणि उत्तराखंड या पर्वतीय राज्यांमध्ये त्याची लागवड सुरू केली आहे.
advertisement
जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वांनी समृद्ध
व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन-ए मुबलक प्रमाणात आढळत असल्याने पॅशन फ्रूटला 'सुपर फ्रूट'च्या श्रेणीत ठेवण्यात आल्याचे ईश्वर सिंग सांगतात. याशिवाय मॅग्नेशियम आणि सोडियम सारखी खनिजेही चांगल्या प्रमाणात असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पॅशन फ्रूटमध्ये सुमारे 36 टक्के रस, 51 टक्के साल आणि 11 टक्के बिया असतात. याच्या बियाही खूप पौष्टिक असतात. त्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण चांगले असते.
advertisement
मधुमेह-यकृताच्या आजारांवर प्रभावी
पॅशन फ्रूटचा रस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. विशेषत: मधुमेह, यकृताशी संबंधित समस्या आणि उच्च रक्तदाबाने ग्रस्त लोकांसाठी. नियमित सेवनाने शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात. जे या आजारांवर उपयुक्त ठरतात. याशिवाय पायनापल ज्यूसची चव वाढवण्यासाठी पॅशन फ्रूट पल्पचाही वापर केला जातो. यामुळे रसामध्ये नैसर्गिक गोडवा आणि ताजेपणा येतो. सध्या या फळाला प्रतिकिलो 300 रुपये दर मिळत आहे.
Location :
Srinagar,Garhwal,Uttarakhand (Uttaranchal)
First Published :
Sep 18, 2024 1:46 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Passion Fruit नव्हे हे आहे पॉवरफुल फ्रूट; BP, शुगरसारख्या आजारांवर रामबाण उपाय










