TRENDING:

Unhealthy Momos: सावधान! तुम्ही मोमोज खाता आहात ? आत्ताच थांबवा नाहीतर येईल पश्चातापाची पाळी

Last Updated:

Risky & Unhealthy Momos: मोमोजमध्ये वापरला जाणारा मैदा हा रिफाइंड पिठापासून बनवला जातो. ज्यात बेंझॉयल पेरोक्साइड, ॲझोडीकार्बोनमाइड आणि इतर ब्लीच आढळून येतात. या रसायनांचा थेट परिणाम स्वादुपिंडावर होऊन इन्सुलिनची अनियमितता येऊ शकते ज्यामुळे डायबिटीसचा धोका उद्धभवतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुळचा तिबेटी, चायनिज फूडच्या नावाने भारतात गल्लोगल्ली विकला जाणारा पदार्थ म्हणजे मोमो किंवा मोमोज. गेल्या काही वर्षात या मोमोजचं अचानक पेव फुटलं. मोमोजने अगदी थोड्याच दिवसात आपल्या चवीने अनेकांना वेडं केलंय. मोमोजचे व्हेज, नॉनव्हेज, स्टीम, फ्राईड असे अनेक प्रकार आहेत. आपल्याकडे जेव्हा कोणताही पदार्थ येतो तेव्हा तो जिथून आलेला आहे त्यापेक्षा तो कितीतरी वेगळ्या पद्धतीने भारतात विकला जातो. साधं उदाहरण द्यायचं झालं तर चायनिज फूडचं देता येईल. आपल्याकडे जसं आणि ज्या पद्धतीचं चायनिज बनवलं जातं तसं तर चीनमध्ये अजिबातचं बनवलं जात नाही. तसंच काहीसं मोमोजचं झालंय. मैद्यामध्ये वेगवेगळे पदार्थ भरायचं आणि ते चिकन, पनीर, चीज अशा विविध नावांनी विकायचे. म्हणून तिबेटी लोकांच्या पौष्टिक आहाराचा भाग असलेले मोमोज भारतात आल्यानंतर ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू लागलेत. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की एखादा पदार्थ एका देशात पौष्टिक असेल तर तो दुसऱ्या देशात धोकादायक कसा ठरू शकतो. याचं साधं सोपं उत्तर आहे की ते कसं बनवलं जातं ?
प्रतिकात्मक फोटो :  सावधान! तुम्ही मोमोज खाता आहात ? आत्ताच थांबवा नाहीतर येईल पश्चातापाची पाळी
प्रतिकात्मक फोटो : सावधान! तुम्ही मोमोज खाता आहात ? आत्ताच थांबवा नाहीतर येईल पश्चातापाची पाळी
advertisement

जाणून घेऊयात भारतात मोमोज आरोग्यासाठी हानिकारक का ठरतात ?

हे सुद्धा वाचा : Shocking : आवडीने मोमोज खाणाऱ्यांनो सावधान! 31 वर्षीय महिलेचा या स्ट्रीट फुडमुळे मृत्यू

advertisement

हानिकारक रसायनं:

एका अहवालानुसार, मोमोजमध्ये वापरला जाणारा मैदा हा रिफाइंड पिठापासून बनवला जातो. ज्यात बेंझॉयल पेरोक्साइड, ॲझोडीकार्बोनमाइड आणि इतर ब्लीच आढळून येतात. या रसायनांचा थेट परिणाम स्वादुपिंडावर होऊन इन्सुलिनची अनियमितता येऊ शकते ज्यामुळे डायबिटीसचा धोका उद्धभवतो.

निकृष्ट दर्जा :

  • मांसाहारी : मांसाहारी मोमोज बनवण्यासाठी निकृष्ट दर्जाचं मांस वापरलं जातं. काही अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की चिकन मोमोज बनवण्यासाठी मेलेल्या कोंबड्य़ाचं मांस वापरले जातं. जीवंत कोंबडीपेक्षा मेलेली कोंबडी ही स्वस्त मिळत असल्याने अनेकदा या कोंबड्यांच्या मांसाचा वापर चिकन मोमोजमध्ये केला जातो.
  • advertisement

  • खराब भाज्या: कमी शिजलेल्या आणि खराब झालेल्या भाज्या व्हेज मोमोजमध्ये वापरल्या जातात. ज्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत. एक तर भाज्या आधीच खराब असतात. त्यात त्या नीट धुतल्या आणि शिजवल्या नसल्याने अपचन, अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढतो.

मूळव्याध होण्याचा धोका:

मोमोज वाफेवर गरम करून शिजवले जातात. पीठ असल्याने ते अल्ट्रा प्रोसेस्ड बनते. अल्ट्रा प्रोसेस्ड फूडमध्ये एकतर फायबर नसतं किंवा ते खूप कमी असतं. यामुळेच मोमोज खाल्ल्यानंतर ते पचायला कठीण जातात. सतत मोमोज खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होतो.

advertisement

हे सुद्धा वाचा : बापरे! तिखट मोमोज खाल्ल्यामुळे पोटात झाला स्फोट, रुग्णांची अवस्था पाहून डॉक्टरही हादरले

हानिकारक चटणी :

मोमोसोबत दिली जाणारी शेझवान चटणी लाल मिरचीचा वापर करून बनविली जाते. या शेझवाज चटणीमध्ये अनेक घातक रसायनं असून शकतात. तसंच मिरचीवर प्रक्रिया केली गेल्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आपल्या मूत्रपिंडात रक्तस्त्राव वाढतो. चटणीसोबत दिल्या जाणाऱ्या मेयोनिजमध्ये फॅटस् भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे वजन वाढण्याची भीती असते.

advertisement

हे सुद्धा वाचा : मेयोनीज मोमोज, फ्रँकी, सँडवीच खाताय सावधान! सरकारने घातली बंदी, पण कारण काय?

मोमोज बनवतानाचा दर्जा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
CCI मार्फत हमीभावीने कापसाची खरेदी सुरू, जालन्यात काय मिळाला भाव?
सर्व पहा

गल्लोगल्ली, रस्तोरस्ती मोमोज विकले जातात. तिथे स्वच्छतेचा अभाव दिसून येतो. याशिवाय उकडलेले मोमोज तयार करताना पाणी कोणत्या दर्जाचं आहे याची आपल्याला कल्पना नसते. तसंच मोमोज तळण्यासाठी वापरल्या जाण्याचा तेलाचा दर्जाही खराब असतो. यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ हृदयरोग, डायबिटीस, किडनी आणि यकृताच्या आजारांचा धोका वाढतो.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Unhealthy Momos: सावधान! तुम्ही मोमोज खाता आहात ? आत्ताच थांबवा नाहीतर येईल पश्चातापाची पाळी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल