TRENDING:

Winter Health Tips: हिवाळ्यात फिट राहायचं आहे मग खा ‘हे’ पदार्थ; वाजणार नाही थंडी आणि पडणार नाहीत आजारी

Last Updated:

Winter Health Tips: हिवाळ्यात बाहेरचं वातावरण अधिक थंड असतं. त्यामुळे शरीराला उबदार ठेवण्यासाठी जास्त उर्जेची गरज असते. जाणून घेऊयात हिवाळ्यात कोणते पदार्थ खाण्याचा शरीराला फायदा होऊ शकतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Winter Health Tips: हिवाळ्याला सुरूवात जरी झाली असली तरीही अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडतोय. राज्यातल्या अनेक शहरात तापमानात वाढ झालीये. काहींना तर हिवाळ्यात AC वापरायची वेळ आलीये. अचानक बदलेल्या या वातावरणाचा त्रास अनेकांना होतोय. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे अशा व्यक्ती आजारी पडण्याची भीती आहे. अनेकांना गेल्या काही आवड्यापासून सुरू असलेली सर्दी आणि खोकला अद्यापही बरा झालेला नाहीये. आज आम्ही तुम्हाला काही असे पदार्थ सांगणार आहोत जे खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला फायदा होईल.
प्रतिकात्मक फोटो : हिवाळ्यात फिट राहायचं आहे मग खा ‘हे’ पदार्थ
प्रतिकात्मक फोटो : हिवाळ्यात फिट राहायचं आहे मग खा ‘हे’ पदार्थ
advertisement

जाणून घेऊयात हिवाळ्यात कोणते पदार्थ खाणं फायद्याचं ?

हिवाळ्यात बाहेरचं वातावरण अधिक थंड असतं. त्यामुळे शरीराला उबदार ठेवण्यासाठी जास्त उर्जेची गरज असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात खालील गोष्टीचा समावेश केला तर तुम्हाला फायदा होईल.

advertisement

सुकामेवा

सुकामेव्यात त्यात भरपूर प्रमाणात फॅट्स आणि ऊर्जा असते. त्यामुळे हिवाळ्यात काजू, बदाम, अक्रोड खाल्ल्याने शरीराला उर्जा मिळून शरीराला आतून उबदार राहायाला मदत होतं.

advertisement

तिळ आणि गूळ

संक्रातीला आपण सगळेचं तिळगूळ खातो. मात्र हिवाळ्यात तिळ आणि गूळ खाल्ल्याने फायदा होतो. तिळात कॅल्शियम, मॅग्नेशियम, आणि झिंक असते, जे हाडांसाठी फायदेशीर आहे.त्यामुळे सांधेदुखाची त्रास कमी होतो. गूळ शरीराला त्वरित ऊर्जा देतो, थकवा दूक करतो.गूळ हा सर्दी आणि खोकल्यावर गुणकारी आहे.

हे सुद्धा वाचा : Joints Pain : सांधेदुखीवर हे उपाय नक्की करा, हिवाळ्यात तब्येतीकडे जास्त लक्ष द्या

advertisement

लसूण आणि आलं

हिवाळ्यात लसूण आणि आले खाणे खूप फायदेशीर असते. आल्यामध्ये उष्णता असते, जी शरीराला आतून गरम करते आणि लसूण शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढलायला मदत करतात.

advertisement

गरम पेये

हळदीचे दूध किंवा विविध सूप  पिणं हिवाळ्यात शरीरासाठी फायदेशीर ठरतं. हळदीचे दूध हे एक नैसर्गिक प्रतिजैविक आहे, जे सर्दी आणि सर्दीपासून देखील संरक्षण करतं. तर विविघ प्रकारच्या सूपमुळे शरीर आतून उबदार राहायला मदत होते.

 हे सुद्धा वाचा: Vitamin D Without Sunlight: हिवाळ्यात कमी सूर्य प्रकाशात व्हिटॅमिन डी कसं मिळवाल? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

तूप आणि लोणी

तूप आणि लोणी हे दोन्ही पदार्थ हिवाळ्यातील आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. तूप उष्ण गुणधर्माचे असल्याने शरीराला उष्णता देते आणि थंडीत रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला मदत करते.लोण्याचा उपयोग त्वचेच्या कोरडेपणासाठी नाहीसा करण्यासाठी केला जाऊ शकतो.

हिरव्या पालेभाज्या

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
फक्त 1000 रुपयांमध्ये रेल्वे स्थानकावर सुरू करा व्यवसाय,असा घ्या खास योजनेचा लाभ
सर्व पहा

हिवाळ्यात शरीरासाठी आवश्यक ती पोषकतत्त्वं, उष्णता हिरव्या पालेभाज्यांमधून मिळतात. थंड हवामानामुळे या भाज्यांमधलं पोषणमूल्य अधिक टिकतं. मेथी, पालक, मोहरी, शेपू, माठ अशा विविध पालेभाज्या हिवाळ्यात खाल्ल्याने फायदा होऊ शकतो.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Winter Health Tips: हिवाळ्यात फिट राहायचं आहे मग खा ‘हे’ पदार्थ; वाजणार नाही थंडी आणि पडणार नाहीत आजारी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल