advertisement

Benefits Of Anjeer: काय सांगाता! ‘हा’ सुकामेवा मांसाहारी? म्हणून ‘या’ व्यक्ती खात नाही हे फळ

Last Updated:

Health Benefits Of Anjeer: अंजीर हा सुकामेव्याचा एक प्रकार असून तो हार्ट ॲटॅक आणि डायबिटीसवर गुणकारी आहे. अंजीर तयार होण्याची प्रक्रिया ही रंजक असल्याने अंजीर शाकाहारी की मासांहारी अशी चर्चा नेहमी होत असते.

प्रतिकात्मक फोटो : काय सांगाता!  अंजीर मांसाहारी? म्हणून ‘या’ व्यक्ती  टाळतात अंजीर
प्रतिकात्मक फोटो : काय सांगाता! अंजीर मांसाहारी? म्हणून ‘या’ व्यक्ती टाळतात अंजीर
Benefits Of Anjeer: सुकामेवा म्हटलं की बदाम, पिस्ते, अक्रोड, काजू, मनुके यांची चित्र लगेचच डोळ्यासमोर येतात. याच सुकामेव्यात आणखी एका फळांचा समावेश होतो जो हार्ट ॲटॅक आणि डायबिटीसवर गुणकारी आहे. रक्तशुद्ध करण्यातही हे फळ महत्वाची भूमिका बजावते. या फळाचं नाव आहे अंजीर. पाहायला गेलं तर एका महाग फळामध्ये अंजीराचा समावेश होतो. मात्र अनेकदा फळ म्हणून ओलं अंजीर खाण्यापेक्षा सुकलेलं अजीर खाणं लोकांना आवडतं.

अंजीर शाकाहारी की मांसाहारी

अंजीर हे दक्षिण आणि पश्चिम आशिया आणि भूमध्य प्रदेशतलं एक महत्वाचं फळ आहे. अंजीर खाल्याने रक्तातली साखरेची पातळी नियंत्रित राहते याशिवाय अंजीर हे हृदयासाठी देखील फायदेशीर आहे. अंजीरांचे परागीभवन गांधीलमाशांमुळे होतं. मादी माशी अंजीराच्या फळामध्ये अंडी घालते. अंडी घातल्यानंतर नरमाशीही फळामध्ये प्रवेश करून मादी माशीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. अनेकदा मादी माशी बाहेर पडत नाही आणि अंजीराच्या आतमध्येच तिचा मृत्यू होतो. अंजीरमध्ये असलेले एन्झाईम्स मृत माशीच्या शरीराचे विघटन करतात आणि ते फळामध्ये मिसळतात. त्यामुळे हे फळ तयार होत असताना एका जीवाचा मृत्यू होतो. मात्र, प्रत्येक अंजारात या प्रक्रियेदरम्यान माशीचा आतमध्ये मृत्यू झाली किंवा ती बाहेर आली, हे कळण्यास मार्ग नसतो. त्यामुळे अनेकजण या फळाला मांसाहारी मानतात.
advertisement

म्हणून हा समाज टाळतो अंजीर

जैन धर्मात अहिंसेला खूप महत्त्व दिले गेले आहे. हा धर्म तत्वज्ञान, अहिंसा, इतर मानवांना आणि प्राण्यांना इजा पोहोचवत नाही. त्यामुळे जैन समाजाचे लोक मांसाहारी पदार्थ खात नाहीत. तसेच जमीनीखाली येणारे रताळे, बटाचेही त्यांना वर्ज्य असते. अंजिरात मध्ये गांधील माशीचे काही घटक असतात त्यामुळे ते अंजीर खात नाहीत.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Benefits Of Anjeer: काय सांगाता! ‘हा’ सुकामेवा मांसाहारी? म्हणून ‘या’ व्यक्ती खात नाही हे फळ
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement