हिवाळ्यात का आणि कसं वाढतं प्रदूषण? ; प्रदूषणापासून स्वत: चा बचाव कसा करणार?
- Published by:Tushar Shete
Last Updated:
उन्हाळा आणि पावसाळ्याऐवजी हिवाळ्यातच प्रदूषण का वाढतं ? हिवाळ्यात प्रदूषण वाढण्याची कारणं जाणून घेऊयात.
मुंबई : हवेतला गारवा किंवा गुलाबी थंडी ही सगळ्यांना आवडते. मात्र याच थंडीचं रूपांतर जेव्हा कडाक्याच्या थंडीत होतं, तेव्हा अनेकांना ही थंडी नकोशी वाटायला लागते. थंडी नकोशी वाटण्यामागे आणखी एक कारण आहे ते म्हणजे प्रदूषण. कारण हिवाळ्यातच प्रदूषण वाढल्याच्या तक्रारी आपल्याला ऐकायला मिळतात. राजधानी दिल्ली सध्या प्रदूषणाची राजधानी झालीये. मुंबईतही हवेची गुणवत्ता घसरल्याचं पाहायला मिळालंय. देशातील इतर अनेक शहरांमध्येही प्रदूषणाची स्थिती गंभीर आहे. हिवाळ्यात प्रदूषण अचानक वाढते, ही एक सामान्य गोष्ट आहे. पण असं का होतं? हे तुम्हाला माहीत आहे का? हिवाळ्यातच प्रदूषण का वाढते? याचेच उत्तर जाणून घेऊ…

हिवाळ्यात प्रदूषण का वाढतं ?
हिवाळ्यात तापममानाचा पारा घसरल्यामुळे हवा थंड होते. थंड हवा उबदार हवेपेक्षा जड असते आणि ती वातावरणात उबदार हवेच्या खालून वाहते. त्यामुळे वाऱ्याचा गतीचा वेग कमी होतो आणि वाऱ्यातले प्रदूषित घटक हवेत अडकून पडतात. जेव्हा हवेत आर्द्रता (ओलावा) जास्त असतो, तेव्हा हवेतली आर्द्रता प्रदूषकांना चिकटून त्यांना जमिनीवर पाडतात. मात्र परंतु जेव्हा आर्द्रता कमी असते तेव्हा प्रदूषकं हवेत तरंगत राहतात. हिवाळ्यात अनेकदा विचित्र परिस्थिती उद्भवते जिला शास्त्रीय भाषेत रिव्हर्स वेदर म्हणतात. यामध्ये तापमान हे उंचीनुसार कधी वाढतं तर कधी कमी होतं. या स्थितीत गरम हवा खाली असलेल्या थंड हवेला दाबते, त्यामुळे प्रदूषित कण हवेत अडकून राहतात. याशिवाय हिवाळ्यात येणाऱ्या धुक्यांमुळेही प्रदूषण वाढतं कारण धुकं प्रदूषित कण शोषून घेतात आणि हवेत मिसळतात, त्यामुळे प्रदूषणाची पातळी वाढते.
advertisement
उन्हाळा, पावसाळ्यात का नसतं प्रदूषण ?
जेव्हा पाऊस पडतो तेव्हा वातावरणातली धूळ, प्रदूषकं आणि अन्य घटक पावसासोबत जमीनीवर पडतात. त्यामुळे हवा स्वच्छ आणि शुद्ध असते. तर उन्हाळ्यात हवेतली आर्द्रता वाढल्याने ती आद्रता प्रदूषित घटकांना जमीनीवर आणते त्यामुळे उन्हाळ्यातही अनेकदा निरभ्र आकाश पाहायला मिळतं.
advertisement
प्रदूषणापासून स्वत:ला कसं रोखाल ?
हिवाळ्यात प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी विविध मार्गांचा वापर करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला. हवा शुद्ध करणाऱ्या यंत्राचा वापर करण्यापासून ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या भाज्यांचा वापर करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. याशिवाय मास्कचा वापर करण्यासोबतच मॉर्निंग वॉक टाळून घरातल्या घरात प्राणायम करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 24, 2024 12:45 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
हिवाळ्यात का आणि कसं वाढतं प्रदूषण? ; प्रदूषणापासून स्वत: चा बचाव कसा करणार?