Millet roti for Winter: हिवाळ्यात कोणती भाकर खावी नाचणी, ज्वारी की बाजरीची; ‘कोणती’ भाकरी खाल्ल्याने होईल नुकसान?
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Millet roti for Winter: अनेकांनी तांदळाच्या भाकरी ऐवजी, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, नागली, मिक्स्ड ग्रेन अशा भाकऱ्या खायला सुरूवात केलीये. मात्र हिवाळ्यात तुम्ही कोणती भाकरी खाल्ल्याने काय फायदे होतील हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल अन्यथा चुकीची भाकरी खाल्ल्याने तुम्हाला फायद्याऐवजी त्रासच होईल.
मुंबई : हिवाळ्याला सुरूवात झालीये. काही ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे गारव्यात घट जरी झाली असली तरीही येत्या काही दिवसात कडाक्याची थंडी पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय. वातावरण बदलामुळे अनेकांना त्रास होण्याची शक्यता आहे. मात्र तुम्ही जेवणात थोडे काही बदल केल्यास या हिवाळ्यात तुम्ही निरोगी राहू शकता. सुरूवात करूया तुमच्या जेवण्यातल्या भाकरीने. भात किंवा तांदळाची भाकरी खाल्ल्याने वजन वाढतं, डायबिटीस होतो असा काहीचा समज आहे. त्यामुळे अनेकांनी तांदळाच्या भाकरी ऐवजी, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, नागली, मिक्स्ड ग्रेन अशा भाकऱ्या खायला सुरूवात केलीये. मात्र यंदाच्या हिवाळ्यात तुम्ही कोणती भाकरी खाल्ल्याने काय फायदे होतील हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल अन्यथा चुकीची भाकरी खाल्ल्याने तुम्हाला फायद्या ऐवजी त्रासच होईल.
जाणून घेऊयात हिवाळ्यात कोणती भाकरी खाणं फायद्याचं आहे ते ?
ज्वारी ही थंड गुणधर्माची (Cooling) धान्य मानलं जाते. ज्यामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि उष्णतेचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे ज्वारीची भाकरी प्रामुख्याने उन्हाळ्यात खाणं फायद्यां ठरतं. परंतु पचनासाठी हलकी असल्याने ती हिवाळ्यातही खाल्ली जाऊ शकते. ज्वारी खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. वजन कमी करण्यासाठी ज्वारीची भाकरी खाणं फायद्याचं ठरेल. ज्वारीत फायबर्स चांगल्या प्रमाणात असतात त्यामुळे ज्वारी खाल्ल्यानंतर फार वेळ भूक लागत नाही. याशिवाय ज्वारीमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहून हृदयविकारांचा धोका टाळता येतो. ज्वारीत असलेल्या मॅग्नेशियम आणि पोटॅशियममुळे रक्तदाबही रक्तदाब नियंत्रित राहतो. ज्वारीमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहून मधुमेहावर नियंत्रण ठेवता येतं.
advertisement
नाचणी ही नैसर्गिकरित्या उष्ण गुणधर्मामुळे शरीराला गरम ठेवण्यास मदत करते. शिवाय नाचणीची भाकरी पचायला हलकी असते त्यामुळे हिवाळ्यात नाचणीची भाकरी खाणं केव्हाही चांगलं. नाचणीच्या भाकरीत अनेक पोषकतत्त्वे असतात.ॲनिमियाचा त्रास असणाऱ्या रूग्णांनी रक्त वाढीसाठी नाचणीच्या भाकरीचा आहारात समावेश करावा.ज्यांना ज्यांना डायबिटीसचा त्रास आहे त्यांनी चपाती खाण्याऐवजी नाचणीची भाकरी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अॅमिनो ॲसिड्स असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती सुधारतात.
advertisement
बाजरी उष्ण गुणधर्माची आहे, जी शरीराला उष्णता देते. बाजरीत असलेल्या फायबर्समुळे पचन चांगलं होतं. भूक कमी लागल्याने लठ्ठपणा कमी व्हायला मदत होते. बाजरीत मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यांचे चांगले प्रमाण असल्याने हाडे आणि सांधे मजबूत होतात, जे हिवाळ्यातील सांधेदुखीसाठी उपयुक्त ठरते. बाजरीच्या ही ग्लूटेन- फ्री आहे त्यामुळे अनेक जण वजन कमी करण्यासाठी चपाती, तांदळाच्या भाकरी ऐवजी बाजरीची भाकरी खाऊ लागले आहेत. बाजरी मॅग्नेशियमचा एक चांगला स्रोत असल्याने, हृदयाच्या रुग्णांनी त्यांच्या आहारात बाजरीच्या भाकऱ्यांचा समावेश करणे फायद्याचं ठरू शकतं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 04, 2024 9:19 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Millet roti for Winter: हिवाळ्यात कोणती भाकर खावी नाचणी, ज्वारी की बाजरीची; ‘कोणती’ भाकरी खाल्ल्याने होईल नुकसान?





