राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. उत्तर भारतातील शीत लहरींमुळे राज्यातील तापामानात मोठी घट झालीये. काही ठिकाणी थंडीची लाट निर्माण झाल्याची स्थिती आहे. मुंबईत देखील यंदा 8 वर्षांतील निचांकी तापमान नोंदवलं गेलंय.
advertisement
2/5
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील किमान तापमानाचा पारा 20 अंशांच्या खाली आला होता. मात्र, आता त्यात पुन्हा वाढ होत आहे. त्यामुळे डिसेंबरचा पहिलाच आठवडा मुंबईकरांचा घाम काढण्याची शक्यता आहे.
advertisement
3/5
मुंबईत आज अंशत: ढगाळ हवामान असणार आहे. किमान तापमानात काहीशी वाढ होणार असून ते 21 अंशांवर राहण्याचा अंदाज आहे. तर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस असेल. तर पुढील 4 दिवसांत किमान तापमानात 25 अंशांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
advertisement
4/5
दिवाळीनंतर मुंबईत हवा प्रदुषणाची पातळी वाढली आहे. आज शहरातील एक्यूआय 227 पर्यंत राहणार असून ही हवा प्रदूषित मानली जाते. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे.
advertisement
5/5
कोकणातील हवामानात देखील सातत्याने बदल होत आहेत. कोकणवासीय अजूनही थंडीच्या प्रतीक्षेत आहेत. अशातच नवं संकट येण्याचा अंदाज आहे. दक्षिण कोकणातील रत्नागिर, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात पुढील 3 दिवसांत अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू