advertisement

संभाजीनगर जिल्हा परिषद 2026 निकाल Live, पैठणमध्ये भुमरेंच्या गडाला लागणार सुरुंग? कुणाची बाजी? संपूर्ण यादी

Last Updated:

Sambhajinagar ZP Election Result: पैठण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला आज सुरुवात होत असून, 9 जिल्हा परिषद गट आणि 18 पंचायत समिती गणांमध्ये निकालाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

News18
News18
Sambhajinagar ZP Election Result: पैठण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला आज सुरुवात होत असून, 9 जिल्हा परिषद गट आणि 18 पंचायत समिती गणांमध्ये निकालाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. तालुक्यातील बहुतांश सर्कलमध्ये विकासापेक्षा जातीय समीकरणे निर्णायक ठरत असल्याचे चित्र असून, अनेक ठिकाणी फरक अत्यल्प असल्याची प्राथमिक माहिती आहे. निकाल LIVE अपडेट होत आहेत.
पैठण तालुक्यात एकूण ९ जिल्हा परिषद गट आहेत. यात पिंपळवाडी, बिडकीन, पाचोड, नांदर, विहामांडवा, नवगाव, ढोरकीन आणि दावरवाडी अशा गटाचा समावेश आहे.

आघाडी–पिछाडीचे चित्र

पैठण तालुक्यात शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट), भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह अपक्ष उमेदवार मोठ्या संख्येने रिंगणात असल्याने अनेक गटांत तिरंगी व चौरंगी लढती आहेत. पिंपळवाडी (अनुसूचित जातीसाठी राखीव) गटात दलित-मुस्लिम, मराठा आणि ओबीसी मतांचे विभाजन निकालावर प्रभाव टाकणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
advertisement

पैठणमध्ये पक्षनिहाय चित्र काय?

शिवसेना (शिंदे): —
शिवसेना (ठाकरे): —
भाजप: —
काँग्रेस: —
राष्ट्रवादी / अपक्ष: —
खरं तर, पैठण तालुका छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांचा बालेकिल्ला मानला जातो. इथून अनेकदा भुमरे आमदारकीला निवडून आले आहेत. सध्या त्यांचे पुत्र विलास भुमरे येथील आमदार आहेत. त्यामुळे भुमरेच्या बालेकिल्ल्यात काय होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. इथं शिंदे गटाला मात देण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे या अंतर्गत कुरघोडीवर कोण सरस ठरणार हे लवकरच स्पष्ट होईल.
advertisement
पिंपळवाडी गटात काँग्रेसचे सदानंद खडसण, भाजप पुरस्कृत रामनाथ केदारे, शिवसेना शिंदे गटाचे दादासाहेब गलांडे आणि भरत मुकुटमल यांच्यात चुरशीची लढत आहे.

पैठणमधील हाय होल्टेज लढती

नांदर गण: ठाकरे गटाचे डॉ. सुनील शिंदे × शिंदे गटाचे उदयसेन काळे
पाचोड गट: शिवराज भुमरे (ZP) यांच्याकडे लक्ष
बिडकीन गट: मनोज पेरे × भाजपचे विजय चव्हाण
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
संभाजीनगर जिल्हा परिषद 2026 निकाल Live, पैठणमध्ये भुमरेंच्या गडाला लागणार सुरुंग? कुणाची बाजी? संपूर्ण यादी
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement