आला थंडीचा महिना, चपाती नको ही गरिबांची भाकरी सगळ्यात बेस्ट, भावही वाढला
- Published by:News18 Marathi
Last Updated:
सध्या ज्वारीला सुगीचे दिवस अले असून बाजारात ज्वारीच्या दरांत मोठी वाढ झाली आहे.
जालना, 14 ऑक्टोबर: पूर्वीच्या काळी ज्वारीची भाकरी खाणं हे गरिबीचं तर गव्हाची चपाती खाणे ही श्रीमंतीचे लक्षण समजलं जायचं. मात्र ही ज्वारी आता भाव खाते आहे. सध्या ज्वारीला 5 ते साडेपाच हजारांचा विक्रमी दर मिळतोय. ज्वारीच्या बाजारभावात इतकी वाढ का झाली? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याच प्रश्नाचं उत्तर जालना येथील बाजार अभ्यासक संजय कानडे यांनी दिलंय.
का वाढतायेत ज्वारीचे दर?
सध्या शहरी भागातील मध्यमवर्गीय आणि श्रीमंत लोक ज्वारी खाण्याकडे वळले आहेत. एकेकाळी गरीबांचं खाणं मानली जाणारी ज्वारी श्रीमंतांची गरज बनत आहे. त्यामुळे शहरी भागातून ज्वारीला चांगली मागणी आहे. तर दुसरीकडे शेतकरी वर्गाने कष्ट अधिक आणि उत्पन्न कमी असल्याने ज्वारीच्या पिकाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सध्या ज्वारीला मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्याने ज्वारीच्या दरात वाढ झाली आहे, असं कानडे सांगतात.
advertisement
किती आहेत सध्याचे दर?
जालना मोंढा मध्ये दररोज 700 ते 800 पोते ज्वारीची आवक होते. या ठिकाणी चांगल्या दर्जाची दूध मोगरा ज्वारी 5 हजार ते साडेपाच हजार, मध्यम गुणवत्ता असलेली ज्वारी 4 हजार पासून तर 5 हजार आणि साधारण ज्वारी 3500 पासून 4 हजार रुपये क्विंटर पर्यंत आहे. तर सध्या ज्वारीला गुजरात कडून मागणी आहे. पुणे, नाशिक आणि मुंबईला चांगल्या प्रकारे मागणी होत आहे.
advertisement
आरोग्याबाबत लोक जागरूक
ग्रामीण भागामध्ये सहसा शेतकरी ज्वारीची भाकरी खायचे. मात्र पै-पाहुणे आले तर गव्हाची चपाती अथवा पोळीला प्राधान्य असचायचे. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. ग्रामीण भागात पाहुणे आले तरी आता चपाती ऐवजी ज्वारीची भाकरी खाण्याला प्राधान्य देत आहेत. शहरातील लोक आरोग्याबाबत जागरुक होत आहेत. ज्वारीच्या भाकरीचे आरोग्यासाठी असलेले फायदे लोकांच्या लक्षात आले आहेत. त्यामुळे ज्वारीच्या भाकरीला पसंती वाढली असून ज्वारीलाही मागणी वाढत आहे. अर्थात गरीबांची ज्वारी आता श्रीमंत लोक खायला लागले. त्यामुळे ज्वारीला चांगले दिवस आल्याचे कानडे सांगतात.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
October 14, 2023 10:51 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
आला थंडीचा महिना, चपाती नको ही गरिबांची भाकरी सगळ्यात बेस्ट, भावही वाढला