वांग्यानं केलं मालामाल! एक एकर शेती आणि 4 महिन्यांत लखपती

Last Updated:
काही शेतकरी आपल्या प्रयोगशीलतेतून चांगलं उत्पन्न मिळवत असतात. जालन्यातील शेतकरी वांग्याच्या शेतीतून चार महिन्यात लखपती झाला आहे.
1/7
शेती क्षेत्र अतिशय आव्हानात्मक बनले आहे. कधी निसर्गाचा कोप, कधी सरकारी अनास्था तर कधी पडलेले बाजारभाव यामुळे शेतकरी नेहमी अडचणीत असतो. शेतकरी आत्महत्या देखील नेहमी होत राहतात.

advertisement
2/7
अशा नकारात्मक वातावरणातही काही शेतकरी वेगवेगळे प्रयोग करून शेती फुलवत आहेत. जालन्यातील शेतकऱ्याने असाच एक प्रयोग करून अवघ्या एका एकरात केवळ चार महिन्यात तीन लाखांचे वांगी उत्पादन घेतले. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कर्जतच्या रामेश्वर शेंडगे यांनी ही किमया केली.

3/7
शेडगे हे मागील अनेक दिवसांपासून पारंपारिक शेती करायचे. मात्र त्यातून फारसा नफा राहत नव्हता. अवघ्या चार महिन्यांपूर्वी त्यांनी एक एकर वांगी लावली. या वांगी उत्पादनातून त्यांना तब्बल तीन लाखांचे उत्पादन चारच महिन्यात मिळाले आहे. पुढील तीन महिन्यात आणखीन एवढेच उत्पादन त्यांना अपेक्षित आहे.

4/7
रामेश्वर शेडगे हे पारंपरिक शेतीला फाटा देत शेतीत वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्यांनी आधी टोमॅटो लागवडीपासून सुरुवात केली. पाच वर्षांपासून ते वांग्याची लागवड करतात आणि या लागवडीतून ते दरवर्षी तीन लाखांच्या आसपास उत्पादन घेतात.

5/7
शेडगे यांनी कर्जत शिवारातील गट नंबर 49 मध्ये एक एकर क्षेत्रात चार बाय अडीच वर एप्रिल महिन्यात वांग्याच्या रोपांची लागवड केली. विशेष म्हणजे सदर रोपं त्यांनी घरीच तयार केली. रोपांसह लागवडीसाठीचा खर्च बराच वाचला.

6/7
नेहमीच्या पद्धतीने शेडगे यांनी वांग्याची लागवड केली. चांगले उत्पादन मिळाल्यानंतर त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने वांग्याची लागवड करण्याचे नियोजन केले. यासाठी परिवाराची मोठी साथ मिळाली. दोघं पती,पत्नी व दोन मुली रोज त्यांना दररोज वांगे तोडण्यासह इतर कामात मदत करतात.

7/7
विशेष म्हणजे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून दरवर्षी वांग्याचे चांगले उत्पादन ते घेत आहेत. वांग्याचा दर्जा चांगला असल्याने त्यास भावही चांगला मिळत आहे. दररोज तोडलेले कॅरेट मार्केटला गेले की लगेच ते विकले जात आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement