177 एपिसोडची महाभयानक वेबसीरिज, पाहिल्यावर उजेडातही भीतीने उडेल थरकाप! 'ही' हॉरर सीरिज OTT वर धुमाकूळ घालतेय
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
OTT Trending Horror Series: ही सीरिज पाहिल्यावर सतत तुम्हाला तुमच्या पाठीमागे कोणीतरी उभं आहे किंवा तुम्हाला दाराआडून कोणीतरी बघतंय असा भास होईल.
मुंबई : हॉरर कंटेंट बघताना तुमचीही बोबडी वळते, पण पाहताना एक वेगळीच किक बसते का? जर तुमचं उत्तर हो असेल तर ही वेबसीरिज तुम्हाला भीतीचा एक वेगळाच अनुभव तुम्हाला देईल, यात शंका नाही. ही सीरिज पाहिल्यावर सतत तुम्हाला तुमच्या पाठीमागे कोणीतरी उभं आहे किंवा तुम्हाला दाराआडून कोणीतरी बघतंय असा भास होईल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
नॉर्मन रीडस, मेलिसा मॅकब्राइड, लॉरेन कोहन आणि जेफ्री डीन मॉर्गन यांसारख्या दिग्गजांनी या सीरिजमध्ये अफलातून अभिनय केला आहे. विशेष म्हणजे जेफ्री डीन मॉर्गनच्या एन्ट्रीने सीरिजमध्ये जो ट्विस्ट आणला, तो आजही अनेकांना शॉक देतो. जर तुमच्यात हे १७७ एपिसोड्स पाहण्याचं धाडस असेल, तर ही सीरिज तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.







