लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्याला घरच्यांनी संपवला, ईदच्या नमाजनंतर आधी चाकूने वारनंतर गोळ्या झाडल्या
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
लष्कर-ए-तैयबाचा कमांडर बिलाल आरिफ सराफी याची लाहोरमध्ये कुटुंबीयांनीच हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
लाहोर: दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा कमांडर बिलाल आरिफ सराफी याची त्याच्या कुटुंबीयांनीच चाकूने वार करून आणि गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी ईदच्या नमाजनंतर घडली.
ही घटना पाकिस्तानातील लाहोरजवळील मुरिदके परिसरात घडल्याचे सांगितले जात आहे. हा परिसर लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयासाठी ओळखला जात होता, ज्यावर ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारतीय सैन्याने हल्ला केला होता.
या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार हा कौटुंबिक वाद असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या काही लोकांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहितीही समोर आली आहे.
advertisement
बिलाल आरिफ सराफी कोण होता?
बिलाल आरिफ सराफी हा 2005 पासून लष्कर-ए-तैयबा या संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी घोषित केलेल्या संघटनेशी संबंधित होता. तो संघटनेसाठी निधी उभारणे, शस्त्रसाठा उपलब्ध करून देणे आणि दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणे या कामांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत होता.
लष्कर-ए-तैयबामधील एक महत्त्वाचा सदस्य म्हणून सराफी तैबा कॉलनीमध्ये इतर वरिष्ठ कमांडर्ससोबत राहत होता. अहवालांनुसार, तो लोकांना विचारधारात्मक प्रशिक्षण देऊन त्यांना ब्रेनवॉश करण्याचे काम करत होता. महत्त्वाचे म्हणजे, सराफी भारतात वाँटेड नव्हता.
advertisement
हत्येनंतरचे व्हिडिओ समोर
या घटनेनंतर सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. ज्यात हत्येनंतरची परिस्थिती दाखवली जात असल्याचा दावा केला जात आहे. मात्र या व्हिडिओंची सत्यता अद्याप पडताळलेली नाही.
Sensitive content🚨🚨
Lashkar-e-Taiba(LeT) commander Bilal Arif Salafi was shot and stabbed to death inside the Markaz Taiba complex in Muridke, near Lahore, Pakistan, shortly after Eid prayers on Sunday.
A man opened fire at close range, while a woman repeatedly stabbed him… pic.twitter.com/BMhVV7n54k
— SK Chakraborty (@sanjoychakra) March 21, 2026
advertisement
या कथित व्हिडिओंमध्ये सराफी जमिनीवर पडलेला दिसत असून आसपासचे लोक त्याला मदत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. घटनेनंतर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचेही यातून स्पष्ट होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 22, 2026 10:21 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्याला घरच्यांनी संपवला, ईदच्या नमाजनंतर आधी चाकूने वारनंतर गोळ्या झाडल्या









