Astrology: खुशखबर येण्याचा दिवस 26 मार्च! गजकेसरी योग जुळल्याचा 3 राशीच्या लोकांना दुहेरी फायदा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology: नशीब चमकण्याची कोणाची वेळ केव्हा येईल, हे कोणाला सांगता येईलच असं नाही. पण, ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांची स्थिती आणि जुळून येणारे शुभ योग यावरून राशीभविष्य सांगितलं जातं. अनपेक्षितरित्या काही राजयोग जुळून येतात आणि त्याचा आपल्या जीवनावर थेट परिणाम होतो. आता लवकरच 26 मार्च रोजी विशेष योग जुळून येत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 26 मार्च हा एक विशेष दिवस मानला जातोय.
advertisement
advertisement
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा गुरू आणि चंद्र एका विशिष्ट स्थितीत म्हणजे केंद्रस्थानांमध्ये असतात तेव्हा गजकेसरी राजयोग तयार होतो. हा योग शहाणपण, संतुलन आणि संधी यांचे प्रतीक मानला जातो."गज" म्हणजे हत्ती, जो स्थिरता आणि संयम दर्शवतो आणि 'केसरी' म्हणजे सिंह, तो नेतृत्व आणि धैर्याचे प्रतीक आहे. या दोन ऊर्जा एकत्र येतात, तेव्हा व्यक्तीची निर्णयक्षमता आणि आत्मविश्वास वाढू शकतो. प्रत्येक ग्रहयोगाप्रमाणे याचा परिणाम सर्व राशींवर होईल, परंतु हा काळ तीन राशींसाठी अधिक फायदेशीर मानला जातो.
advertisement
advertisement
advertisement
कन्या: कन्या राशीच्या लोकांसाठी हा योग त्यांचे करिअर अधिक चांगले करण्यास हातभार लावेल. खूप काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ लागतील त्यांन तुमचा आत्मविश्वास वाढेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)








