advertisement

Rohit Sharma : रोहित शर्माने मुंबई इंडियन्सना शब्द दिला... हार्दिक-सूर्या शेजारी, समोर चाहत्यांचा गराडा!

Last Updated:
आयपीएल 2026 च्या मोसमाला आता आठवड्याभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. 28 मार्चपासून आयपीएलच्या 19 व्या मोसमाला सुरूवात होणार आहे.
1/8
आयपीएलची सगळ्यात यशस्वी टीम असलेल्या मुंबई इंडियन्सना मागच्या 5 वर्षांमध्ये एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. मुंबई इंडियन्सकडे आतापर्यंत सर्वाधिक 5 ट्रॉफी आहेत, पण 2020 नंतर मुंबईला एकदाही चॅम्पियन होता आलेलं नाही. मुंबईने ज्या 5 ट्रॉफी जिंकल्या त्यात रोहित शर्मा कर्णधार होता.

2/8
मागच्या 2 वर्षांपासून मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी हार्दिक पांड्याकडे आहे, पण 2024 मध्ये मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर राहिली, तर मागच्या मोसमात मुंबईला पहिल्या 5 पैकी फक्त 1 मॅच जिंकता आली.

3/8
मागच्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात मात्र मुंबईने धमाकेदार कमबॅक केलं आणि प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला, पण दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पंजाबकडून मुंबईला पराभवाचा धक्का बसला आणि मुंबईच्या आणखी एका ट्रॉफीचं स्वप्न भंगलं.

4/8
मागच्या 5 वर्षांपासून ट्रॉफीच्या प्रतिक्षेत असलेल्या मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी रोहित शर्माने प्रॉमिस केलं आहे. 'तुमच्या सगळ्यांसाठी आमची टीम सहावी ट्रॉफी आणण्याचा पूर्ण प्रयत्न करेल', असं रोहित शर्मा म्हणाला आहे.

5/8
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला मोठी जबाबदारी दिली आहे. आयपीएलच्या मागच्या मोसमात रोहित शर्मा दुखापतीमुळे इम्पॅक्ट सब म्हणून खेळला होता, त्यामुळे मुंबई इंडियन्सवर मोठ्या प्रमाणावर टीकाही झाली.

6/8
यंदाच्या आयपीएलमध्ये रोहित इम्पॅक्ट सब म्हणून खेळणार नसून तो पूर्ण 20 ओव्हर फिल्डिंगही करेल, असं कोच महेला जयवर्धनेने स्पष्ट केलं आहे. रोहित शर्मा पूर्णवेळ फिल्डिंगला राहिला तर तो कर्णधार हार्दिक पांड्याला मदत करू शकतो, तसंच रोहितच्या अनुभवाचा फायदा मुंबईला घेता येईल.

7/8
मुंबई इंडियन्स यंदाच्या मोसमात ट्रॉफी जिंकण्याची प्रबल दावेदार आहे. कागदावर मुंबईची टीम मजबूत वाटत आहे. टीममध्ये रोहित शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रेयान रिकलटन आणि क्विंटन डिकॉक असे तगडे बॅटर आहेत, तर बुमराह, बोल्ट, सॅन्टनर यांच्यासारखे वर्ल्ड क्लास बॉलर आहेत.

8/8
मुंबई इंडियन्सने जिओ वर्ल्ड गार्डनमध्ये बॉन्डिंग प्रोग्राम ठेवला होता, ज्याला मिक्स नाव देण्यात आलं. शनिवारी झालेल्या या कार्यक्रमात टीमचे सगळे खेळाडू, कोच आणि मॅनेजमेंटचे सदस्य सहभागी झाले. कर्णधार हार्दिक पांड्या त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मासोबत तर रोहित शर्मा मुलीसोबत आला होता.

Maharashtra Kesari : 'महाराष्ट्र केसरी' विजेत्यावर बक्षिसांचा पाऊस, रोख रक्कम अन् फॉर्च्युनर गाडी, कोण बाजी मारणार?
'महाराष्ट्र केसरी' विजेत्यावर बक्षिसांचा पाऊस, रोख रक्कम अन् फॉर्च्युनर गाडी, कोण बाजी मारणार?
  • महाराष्ट्र केसरीचा विजेता मालामाल होणार

  • फॉर्च्युनर गाडीसह रोख बक्षीस मिळणार

  • मानाची गदा कोण पटकावणार?

View All
advertisement