advertisement

कोल्हापूरच्या ज्योतिबा मंदिरात भाविकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण, भक्ताच्या डोक्यात नारळ फोडला, पुजाऱ्यांकडून हल्ला

Last Updated:

कोल्हापूरच्या ज्योतिबा मंदिर परिसरात सुमारे 15 ते 20 पुजाऱ्यांनी या दोन भाविकांवर अचानक हल्ला केला.

ज्योतिबा मंदिरात भक्तांना मारहाण
ज्योतिबा मंदिरात भक्तांना मारहाण
ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा मंदिर परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या दोन भाविकांना काही पुजाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मंदिरातील सुमारे 15 ते 20 पुजाऱ्यांनी या दोन भाविकांवर अचानक हल्ला केला. पुजारी भाविकांच्या अंगावर अक्षरशः तुटून पडले असून, त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली जात आहे. एवढंच नव्हे, तर काही पुजाऱ्यांनी भाविकांच्या डोक्यात नारळ फोडल्याचंही स्पष्टपणे दिसत आहे.
ही मारहाण नेमकी कशामुळे झाली, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कोणत्या वादातून ही घटना घडली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे भाविकांमध्ये संतापाची लाट आहे.
advertisement
दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि पोलिस यंत्रणा घटनेची चौकशी करीत आहे. पुजाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी भाविक करीत आहे. दोषींवर कठोर कारवाई करून अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कोल्हापूरच्या ज्योतिबा मंदिरात भाविकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण, भक्ताच्या डोक्यात नारळ फोडला, पुजाऱ्यांकडून हल्ला
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपुर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपुर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
View All
advertisement