Joints Pain : सांधेदुखीवर हे उपाय नक्की करा, हिवाळ्यात तब्येतीकडे जास्त लक्ष द्या

Last Updated:

अनेकांना हिवाळ्यात अंग दुखणं, सांधेदुखीचा त्रास जास्त जाणवतो. सांधेदुखीची समस्या दूर करण्यासाठी आणि कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय सांधेदुखीपासून आराम देतात.

News18
News18
मुंबई : अनेकांना हिवाळ्यात अंग दुखणं, सांधेदुखीचा त्रास जास्त जाणवतो. सांधेदुखीची समस्या दूर करण्यासाठी आणि कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय सांधेदुखीपासून आराम देतात.
म्हातारपणी अनेकांना सांधेदुखीचा त्रास होतो. वृद्धत्वाव्यतिरिक्त, दुखापत, हाडं कमकुवत होणं, किंवा इतर कोणत्याही वैद्यकीय स्थितीमुळे देखील सांधेदुखी होऊ शकते. एकदा ही वेदना सुरू झाली की, त्या व्यक्तीला उठणं-बसणंही कठीण होतं.
गरम शेक -
advertisement
सांधेदुखी कमी करण्यासाठी शेकणं हा उत्तम उपाय आहे. तुम्ही तव्यावर गरम कापड ठेवून सांध्यांना शेक देऊ शकता किंवा हीटिंग पॅड वापरुनही सांध्यांना आराम देऊ शकता. या उबदारपणामुळे स्नायू आणि सांध्यांना आराम मिळतो. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि सांधे वाकणं सोपं होतं.
हळदीचा लेप -
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली हळद त्वचेवर लावल्याचे अनेक फायदे आहेत. हळदीचा लेप लावल्यानं सांधेदुखी दूर होते. यासाठी मोहरीच्या तेलात हळद लावून त्याचा लेप थेट गुडघ्यावर लावू शकता.
advertisement
हळदीचं दूध -
दुधात हळद टाकून रोज प्यायल्यानं वेदना आतून कमी होते. मात्र, हे दूध बनवण्यासाठी हळद पावडरपेक्षा कच्ची हळद चांगली असते. कच्ची हळद बारीक करुन दुधात घालून उकळवून घ्या. या पिवळ्या दुधानं गुडघेदुखी बरी होते.
advertisement
पोषक तत्वांनी युक्त अन्न खा
आहारात सुधारणा करुनही सांधेदुखीपासून आराम मिळू शकतो. तुम्ही तुमच्या आहारात फायबर युक्त ओट्स, केळी, काकडी, पेरू, सफरचंद आणि गाजर इत्यादींचा समावेश करु शकता. स्नायूंच्या समस्या दूर ठेवण्यासाठी फायबरचे सेवन परिणामकारक ठरु शकतं. आहारात कॅल्शियम आणि प्रथिनांचं प्रमाण वाढवणं देखील महत्त्वाचं आहे. दूध, अंडी, बदाम, ब्रोकोली, कडधान्यांचा समावेश आहारात खाऊ शकता.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Joints Pain : सांधेदुखीवर हे उपाय नक्की करा, हिवाळ्यात तब्येतीकडे जास्त लक्ष द्या
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement