Dandruff : हिवाळ्यात कोंडा कसा कराल कमी ? खोबरेल तेल वापरा, केस दिसतील मुलायम

Last Updated:

अनेकदा हिवाळ्यात केसात कोंडा होण्याची समस्या जास्त वाढते. खोबरेल तेलाबरोबरच लिंबू, दही, कडुनिंबाची पानं याचा वापर करुन कोंड्याचं प्रमाण कमी करता येतं. 

News18
News18
मुंबई : हिवाळ्यामध्ये त्वचा आणि केस कोरडे होतात. अनेकदा हिवाळ्यात केसात कोंडा होण्याची समस्या जास्त वाढते. यासाठी एक उपाय हमखास लागू पडतो, तो म्हणजे खोबरेल तेल. फक्त खोबरेल तेल न वापरता त्यात आणखी काही गोष्टी मिसळा आणि केसांना लावा. यामुळे टाळू पूर्णपणे स्वच्छ राहतो.
हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे गरम पाण्यानं केस धुणं. जे लोक डोक्यावर
गरम पाणी ओततात, आपल्या आहाराची काळजी घेत नाहीत, अनेक दिवस केस धुत नाहीत किंवा केसांची काळजी नीट घेत नाहीत, त्यांच्या केसांमध्ये कोंडा दिसू लागतो.
अनेकदा केसांना स्पर्श करताच कोंडा पडतो. अशावेळी, कोंड्यापासून सुटका मिळवण्यासाठी खोबरेल तेलात
advertisement
काय मिसळावं आणि लावावं जाणून घेऊया, हे घरगुती उपाय कोंडा दूर करण्यासाठी प्रभावी ठरतात.
डोक्यातील कोंडा काढण्यासाठी खोबरेल तेल
डोक्यातील कोंडा काढून टाकण्यासाठी खोबरेल तेल लिंबाच्या रसात मिसळू शकता. यासाठी एका भांड्यात २ ते ३ चमचे गरम खोबरेल तेल घ्या. त्यात लिंबाचा रस समान प्रमाणात मिसळा. आता हे मिश्रण संपूर्ण केसांना नीट लावल्यानंतर एक ते दीड तास ठेवा आणि नंतर धुवून स्वच्छ करा. कोंड्याचं प्रमाण हळूहळू कमी होईल.
advertisement
दही
केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी दही लावता येईल. एक वाटी दही केसांच्या मुळापासून शेवटपर्यंत लावा आणि थोडा वेळ ठेवा. ते बोटांनी घासून केस धुवून काढा. दही हा कोंड्यावर रामबाण उपाय असल्याचं सांगितलं जातं. यामुळे केस चांगले स्वच्छ होतात. लिंबाचा रसही दह्यात मिसळून डोक्याला लावता येतो.
advertisement
बेकिंग सोडा
कोंडा दूर करण्यासाठी बेकिंग सोडा केसांना लावता येतो. यासाठी पाण्यात बेकिंग सोडा मिसळून द्रावण तयार करा. हे द्रावण डोक्याला लावून चोळा आणि नंतर डोके धुवा. डोक्यातील कोंडा सोबतच टाळूवर साचलेला मळही यामुळे काढला जातो.
कडुनिंब
कडुनिंबाचा वापर करून कोंडा दूर करता येतो. कडुनिंबाची पानं बारीक करून पेस्ट बनवा. ही पेस्ट सर्व केसांवर लावा आणि काही वेळानं डोकं धुवून स्वच्छ करा. कोंडा हळूहळू कमी होतो.
advertisement
कॉफी
कॉफी स्क्रब बनवून टाळूवर लावल्यास कोंडा कमी होतो. यासाठी कॉफीमध्ये थोडं खोबरेल तेल मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांच्या मुळांवर लावा आणि चोळा. 3 ते 4 मिनिटं चोळल्यानंतर, डोकं धुवा. टाळूवरील कोंडा, जमा झालेला मळ आणि मृत त्वचा यामुळे काढता येते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Dandruff : हिवाळ्यात कोंडा कसा कराल कमी ? खोबरेल तेल वापरा, केस दिसतील मुलायम
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement