Garlic : रिकाम्या पोटी खा कच्च्या लसणाची एक पाकळी, शरीरासाठी आहे फायदेशीर
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
लसूण नियमित खाण्याचे शरीराला अनेक फायदे मिळू शकतात, परंतु योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीनं सेवन करणं महत्त्वाचं आहे.
मुंबई : सकाळी रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाणं तुमच्या आरोग्यासाठी एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे.
लसूण नियमित खाण्याचे अनेक फायदे आहेत. लसूण ज्याला आयुर्वेदात उत्तम औषध मानलं जातं. प्राचीन काळापासून लसूण त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखला जातो. यामध्ये असलेले पोषक आणि अँटिऑक्सिडंट्स शरीराला निरोगी ठेवण्यासाठी मोठी भूमिका बजावतात. सकाळी दात घासल्यानंतर रिकाम्या पोटी कच्च्या लसणाची एक पाकळी खाल्ल्याचे शरीराला अनेक फायदे आहेत.
लसूण नियमित खाण्याचे शरीराला अनेक फायदे मिळू शकतात, परंतु योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीनं सेवन
advertisement
करणं महत्त्वाचं आहे.
1. प्रतिकारशक्ती मजबूत होते-
लसणामध्ये ॲलिसिन नावाचा घटक असतो, ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती (रोगप्रतिकार शक्ती) वाढते.
सर्दी, खोकला आणि संक्रमणाशी लढण्यासाठी याची मदत होते.
2. हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्यानं कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते. यामुळे खराब कोलेस्टेरॉल (LDL) कमी करता येतं आणि चांगलं कोलेस्ट्रॉल (HDL) वाढविण्यास मदत होते. तसंच, रक्तदाब नियंत्रित ठेवून हृदय निरोगी ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो.
advertisement
3. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त -
लसूण खाल्ल्यानं चयापचय गतिमान राहतं, ज्यामुळे शरीरातील चरबी जळण्याचा वेग वाढतो. रोज सकाळी कच्चा लसूण खाल्ल्यानं वजन कमी होण्यास मदत होते.
4. डिटॉक्सिफिकेशनमध्ये उपयुक्त -
लसूण शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी उपयुक्त आहे. यामध्ये असलेलं सल्फर यकृत डिटॉक्स करतं, ज्यामुळे शरीर निरोगी राहतं आणि शरीराला ऊर्जा परिपूर्णपणे मिळते.
advertisement
5. पचनसंस्था सुधारते -
रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्यानं पचनक्रिया सुधारते. पोटातील गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
6. त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर -
लसणात असलेले अँटिऑक्सिडेंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनवतात.
यामुळे केस गळणं कमी होतं आणि केस मजबूत होतात.
advertisement
7. मधुमेह नियंत्रणासाठी उपयुक्त -
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी लसूण उपयुक्त आहे. मधुमेहाच्या रुग्णांना लसूण रोज खाल्ल्याचा खूप फायदा होतो.
लसूण कसा खाल ?
सकाळी दात घासल्यानंतर कच्च्या लसणाची एक पाकळी सोलून खा. लसूण गिळा किंवा हलका चघळून खा. कच्चा लसूण खाण्यास त्रास होत असेल तर एक ग्लास कोमट पाण्यासोबत घ्या.
advertisement
या गोष्टी लक्षात ठेवा :
ज्यांना लसणाची ऍलर्जी आहे त्यांनी लसूण खाऊ नये. लसूण जास्त प्रमाणात खाल्ल्यानं पोटात जळजळ होऊ शकते. गर्भवती महिला आणि औषधे घेत असलेल्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच लसूण खावा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 03, 2024 7:54 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Garlic : रिकाम्या पोटी खा कच्च्या लसणाची एक पाकळी, शरीरासाठी आहे फायदेशीर