Spinach : पालक खा, शरीरातील लोहाची कमतरता दूर करा
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
शरीरात लोहाची कमतरता असेल तर याच भाज्यांमधलं हमखास नाव म्हणजे पालक..या भाजीचा आहारात नक्की समावेश करा.
मुंबई : हिवाळ्यात खास करुन भाज्या चांगल्या गुणवत्तेच्या मिळतात. प्रत्येक भाजीची स्वतंत्र ओळख आहे, आणि प्रत्येक भाजीचे उपयोगही. शरीरात लोहाची कमतरता असेल तर याच भाज्यांमधलं हमखास नाव म्हणजे पालक..या भाजीचा आहारात नक्की समावेश करा.
हिवाळ्यात अनेक प्रकारच्या हंगामी भाज्या मिळतात, या भाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. तुम्हालाही हिरव्या भाज्या खायला आवडत असतील पालक हा चांगला पर्याय आहे.
पालक ही हिरवी पालेभाजी, ज्यात लोह, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात आढळतात. ज्याचे शरीराला अनेक फायदे आहेत.
पालक खाण्याचे फायदे-
1. लोह-
advertisement
पालकामध्ये लोह चांगल्या प्रमाणात आढळतं, तुम्हाला ॲनिमियाची समस्या असेल तर तुम्ही पालक नक्की खा.
2. त्वचा-
पालकामध्ये असलेले व्हिटॅमिन ए आणि सी त्वचेच्या आरोग्यासाठी खास आहे. यामुळे त्वचेला आवश्यक आर्द्रता मिळते आणि वृद्धत्वाचे परिणाम कमी करण्यास मदत होते.
advertisement
3. हाडं-
हिवाळ्यात हाडांच्या समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात. जर तुम्हालाही तुमची कमकुवत हाडे मजबूत करायची असतील तर तुम्ही पालकाचा आहारात समावेश नक्की करा.
आहारात पालकाचा समावेश कसा करावा -
1. भाजी
फक्त पालकाची भाजी किंवा त्यात इतर जिन्नस घालून पालकाची भाजी खा. याची चवही छान असते आणि आरोग्यासाठी हा खजिना आहे.
advertisement
2. रस-
पालकची भाजी आवडत नसेल तर तुम्ही त्याचा रस बनवून पिऊ शकता.
३. सूप-
हिवाळ्यात सूप पिणं आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. पालक सूपही आरोग्यदायी आहे.
पालकाची भाजी, पालकाचं वरण आहारात नक्की असू द्या, शरीरासाठी हे पौष्टिक आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 03, 2024 8:26 PM IST