Cashews : रोज किती काजू खावेत ? फायदे - तोटे समजून घ्या, मगच ठरवा काजूचं प्रमाण
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
काजू बहुतेकांना खायला आवडतात. काजू भरपूर खाणं वाईट कारण काजू जास्त खाल्ले तर आरोग्यासाठी फायद्याऐवजी हानिकारक ठरु शकतं.
मुंबई : सुका मेवा बहुतेकांना आवडतो पण एकदा खायला लागलं की खूपही खाल्ला जातो. कुठलीही गोष्ट जास्त खाल्ली की प्रकृतीला त्रास होतो. त्यामुळे ते खाण्याचं प्रमाण किती असावं हे कायम लक्षात ठेवावं. नाहीतर फायद्यापेक्षा नुकसान जास्त होईल. त्यातलाच एक म्हणजे काजू. काजू बहुतेकांना खायला आवडतात. काजू आरोग्यासाठी खूप फायदेशीरही आहेत. त्यामुळे, सुक्या मेव्याचा विचार केला तर काजूचं नाव अग्रक्रमानं येतं.
काजूमध्ये फायबर, थायमिन, व्हिटॅमिन बी6, मँगनीज, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि झिंक सारखे गुणधर्म आढळतात. यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. पण म्हणून ते भरपूर खाणं वाईट आहे. दिवसातून फक्त 4-5 काजू खाणं चांगलं मानलं जातं. यापेक्षा जास्त खाल्ले तर ते तुमच्या आरोग्याला फायद्याऐवजी हानी पोहोचवू शकतात.
advertisement
1. हाडं -
हिवाळ्यात कमकुवत हाडांची समस्या जास्त जाणवते. हाडं कमकुवत होण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही
तुमच्या आहारात काजूचा समावेश करू शकता. कारण काजूमध्ये कॅल्शियम चांगल्या प्रमाणात आढळतं,
जे हाडं मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे.
2. पचन-
काजूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं, ज्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते. काजूमुळे पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.
advertisement
3. लोह-
तुम्हाला ॲनिमियाचा त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या आहारात काजूचा समावेश करू शकता. कारण काजू हा
लोहाचाही चांगला स्रोत मानला जातो.
४. त्वचा-
काजूमध्ये असे अनेक गुणधर्म आढळतात, ज्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. जर तुम्हाला त्वचेशी संबंधित समस्या असतील तर तुम्ही तुमच्या आहारात काजूचा समावेश नक्की करा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 04, 2024 6:42 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Cashews : रोज किती काजू खावेत ? फायदे - तोटे समजून घ्या, मगच ठरवा काजूचं प्रमाण