advertisement

ए चल निघ! 'बिग बॉस मराठी'नंतर The 50 मध्ये निक्की-आर्याचा राडा, दुसऱ्याच दिवशी एकमेकांशी भिडल्या, VIDEO

Last Updated:

कालपासूनच The 50 शोचा श्रीगणेशा झाला असून दुसऱ्याच दिवशी निक्की तांबोळी आणि आर्या जाधव यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळतंय. या दोघींमधलं हे महायुद्ध सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे.

News18
News18
मुंबई : 'बिग बॉस मराठी ५' मध्ये रागाच्या भरात आर्याने निक्कीच्या कानाखाली जाळ काढला होता आणि थेट घराबाहेरचा रस्ता धरला होता. त्या वादाची ठिणगी आता पुन्हा एकदा पेटली आहे. निमित्त ठरलंय जिओ हॉटस्टारवरील नवा कोरा रियालिटी शो 'The 50'. कालपासूनच या शोचा श्रीगणेशा झाला असून दुसऱ्याच दिवशी निक्की तांबोळी आणि आर्या जाधव यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळतंय. या दोघींमधलं हे महायुद्ध सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे.

निक्कीचं आर्याला ओपन चॅलेंज

'The 50' या शोचा नवा प्रोमो समोर आला असून यामध्ये घराचं वातावरण चांगलंच तापलेलं दिसतंय. निक्की तांबोळी ढसाढसा रडताना दिसत आहे आणि तिचा बॉयफ्रेंड अरबाज पटेल तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करतोय. निक्की रडतच अरबाजला म्हणते, "हे लोक माझ्याबद्दल काय बोलतायेत याने मला फरक पडत नाही." यावर अरबाज तिला स्मार्ट गेम खेळण्याचा सल्ला देतो.
advertisement
पण खरा ड्रामा सुरू होतो जेव्हा आर्या आणि निक्की एकमेकींसमोर येतात. जुना हिशोब चुकता करायच्या तयारीत असलेली निक्की आर्याच्या अंगावर धावून जात ओरडते, "मला हात तर लावून दाखव!" यावर आर्याही शांत बसत नाही, ती निक्कीला झापत म्हणते, "निघ... निघ इथून!" निक्की इतक्यावरच थांबत नाही, ती थेट आर्याला शोमधून बाहेर काढण्याची भाषा करू लागली आहे.
advertisement
advertisement

मराठी कलाकारांची The 50 मध्ये एन्ट्री

या शोचं वैशिष्ट्य म्हणजे यात फक्त निक्की आणि आर्याच नाही, तर 'बिग बॉस मराठी' गाजवणारे अनेक चेहरे सहभागी झाले आहेत. निक्की-अरबाज जोडीसोबतच जान्हवी किल्लेकर आणि 'बिग बॉस मराठी २'चा विनर शिव ठाकरे देखील या शोमध्ये आहे. तर सोशल मीडिया स्टार सौरभ घाडगे, बेबिका ध्रुवे यांचाही या शोमध्ये सहभाग आहे. सध्या निक्की, अरबाज आणि जान्हवी हे एकाच टीममधून खेळताना दिसत आहेत, त्यामुळे आर्यासाठी हा प्रवास खडतर असणार हे नक्की.
advertisement

काय आहे 'The 50' चा खेळ?

या शोमध्ये एकूण ५० स्पर्धकांनी प्रवेश केला आहे. पहिल्याच दिवशी एका स्पर्धकाचा गेम संपला असून आता उरलेले ४९ जण एकाच छताखाली राहणार आहेत. बिग बॉसमध्ये आर्याने निक्कीवर हात उचलल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं होतं. आता 'The 50' च्या या नवीन फॉरमॅटमध्ये आर्या तिचा बदला घेते की निक्की तिला पुन्हा एकदा घराबाहेर काढण्यात यशस्वी होते, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
ए चल निघ! 'बिग बॉस मराठी'नंतर The 50 मध्ये निक्की-आर्याचा राडा, दुसऱ्याच दिवशी एकमेकांशी भिडल्या, VIDEO
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement