Ranveer Singh : 'धुरंधर' रणवीर सिंगकडून मोठा 'गुन्हा', होतोय पश्चाताप; देवाचा धावा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Ranveer Singh : सध्या धुरंधर 2 मुळे चर्चेत असलेला अभिनेता रणवीर सिंगकडून आधी मोठी चूक घडली आहे. त्याचा त्याला पश्चातप झाला आणि त्याने माफीही मागितली. पण आता तो देवाच्या चरणी जाणार आहे.
advertisement
advertisement
ही फिल्म म्हणजे कांतार : चॅप्टर 1. ज्यातील ऋषभ शेट्टीच्या अभिनयाची नक्कल रणवीरने केली होती आणि पवित्र देवतेचा उल्लेख भूत असा केला होता. यामुळे संपूर्ण देशभरातील हिंदू भावना दुखावल्या होत्या. याप्रकरणी रणवीरविरोधात कर्नाटकच्या बंगळुरूमधील हाय ग्राऊंड्स पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
advertisement
हे प्रकरण कोर्टात गेलं. कोर्टाने रणवीरला फटकारलं होतं. "तुम्ही सुपरस्टार असाल, पण तुम्ही कायद्याच्या वर नाही आहात हे लक्षात ठेवा. सार्वजनिक ठिकाणी बोलताना आणि वावरताना सेलिब्रिटींनी जबाबदारीनंच वागायला हवं. इंटरनेट, सोशल मीडिया काहीही विसरत नाही, त्यामुळं विचार करून बोलायला हवं," असं कोर्टाने रणवीरचे कान टोचले होते.
advertisement
advertisement
advertisement










