Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाबाबत मोठं अपडेट, बस अन् मेट्रोची थेट कनेक्टिव्हिटी, उड्डाणांबाबत घेतला निर्णय
Last Updated:
Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होणार असून प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि जलद होणार आहे.
नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळ सुरु होऊन साधारण 3 महिने झाले आहे. विमानतळावर पोहचण्यासाठी अनेक उपक्रम हातीही घेण्यात आलेले आहे. त्यासाठी आता विमानतळावर एक पॅसेंजर इंटरजेंज आणि या इंटरजेंजद्वारे तब्बल 4 मेट्रो मार्गिकांची जोडणी होणार आहे तर विमान सेवांचा महाराष्ट्रातील विविध भागात विस्तार करण्यात येणार आहे.
कसे असतील मेट्रो मार्ग?
मुंबई शहर ते नवी मुंबईला जोडणारी मेट्रो लाईन 8 असून ती नवी मुंबई विमानतळाला जोडणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनस 2 पासून ती मार्गिका सुरु होऊन थेट नवी मुंबई विमानतळाला जोडणार आहे. या असलेल्या टर्मिनलवरील मेट्रो 8वरील स्थानकावर मेट्रो लाईन 7 आणि 3 शी जोडणी मिळणार आहे. एवढंच नाही तर मेट्रो लाईन 8 वरुन प्रवाशांना मेट्रो लाईन 4,2 आणि नवी मुंबई मेट्रो लाईन 1 साठी प्रवासी इंटरचेंज तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे नवी मुंबई विमानतळावरुन 4 मेट्रो सेवा लवकर उपलब्ध होणार आहेत.
advertisement
मेट्रो मार्गिकेचे जाळे निर्माण होणार असून नवी मुंबई विमानतळाच्या सेवेचाहा विस्तार होणार असल्याची माहिती समोर आलेला आहे. तर 29 मार्चपासून विमानसेवांची संख्या ही 76 होणार आहे. कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरसाठीही उड्डाणे सुरु होणार आहे.
बससेवाची मिळणार जोडणी
दरम्यान चार मेट्रो मार्गिकांच्या माध्यमातून नवी मुंबई विमानतळाला कुर्ला रेल्वे स्थानक, लोकमान्य टिळक टर्मिनस तसेच मानखुर्द येथील अंतरराज्य बस टर्मिनसशी थेट जोडणी दिली जाणार आहे.
advertisement
सध्याच्या स्थितीला नवी मुंबई विमानतळाजवळ कोणतेही रेल्वे स्थानक आणि मेट्रो स्थानक नाही. त्यामुळे प्रवाशांना टॅक्सी किंवा कॅब करुनच विमानतळापर्यंत पोहोचावं लागतं. अशावेळेस सर्व सामान्यांना हे भाडे परवडणारे नसून वाहतूकोंडीतही प्रवाशांचा जास्त वेळ वाया जातो. त्यामुळे याठिकाणी लवकरात लवकर सार्वजनिक वाहतूक सुरु करण्याची मागणी होत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 25, 2026 11:07 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाबाबत मोठं अपडेट, बस अन् मेट्रोची थेट कनेक्टिव्हिटी, उड्डाणांबाबत घेतला निर्णय










