advertisement

बायकोच्या निधनाने पूर्णपणे खचला, तब्बल 8 महिन्यांनी अभिनेत्याचं कमबॅक, पहिल्यांदाच दिसणार 'या' रोलमध्ये!

Last Updated:
Parag Tyagi Comeback After 8 Months: गेले आठ महिने पराग सर्वांपासून दूर शेफालीच्या आठवणीत जगत होता, पण आता पुन्हा एकदा त्याने स्वतःला सावरलं असून तो टीव्ही सेटवर परतला आहे.
1/8
मुंबई : ज्या जोडीकडे पाहून लोक प्रेमाची उदाहरणे द्यायचे, त्याच जोडीला काळाने कायमचं वेगळं केलं. गेल्या वर्षी २७ जून २०२५ रोजी 'काटा लगा' गर्ल शेफाली जरीवाला हिच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण टीव्ही सृष्टी हादरली होती.

2/8
अवघ्या ४२ व्या वर्षी शेफालीने जगाचा निरोप घेतला आणि तिचा पती अभिनेता पराग त्यागी याचं आयुष्य जणू क्षणात कोलमडलं. गेले आठ महिने पराग सर्वांपासून दूर शेफालीच्या आठवणीत जगत होता, पण आता पुन्हा एकदा त्याने स्वतःला सावरलं असून तो टीव्ही सेटवर परतला आहे.

3/8
शेफाली आणि पराग यांची जोडी 'बिग बॉस' आणि 'नच बलिये' सारख्या शोमधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. २००९ मध्ये एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून सुरू झालेली ही मैत्री २०१४ मध्ये लग्नाच्या बेडीत अडकली.

4/8
मात्र, गेल्या वर्षी शेफालीला आलेल्या हार्ट अटॅकने परागचं सर्वस्व हिरावलं. गेल्या आठ महिन्यांत परागने अनेकदा सोशल मीडियावर शेफालीच्या आठवणी शेअर केल्या.

5/8
तिच्या वाढदिवसाला अनाथ मुलांसोबत वेळ घालवणं असो किंवा तिचे जुने फोटो शेअर करणं, पराग प्रत्येक क्षणी तिला शोधत होता. पण आता 'शो मस्ट गो ऑन!' असं म्हणत त्याने आयुष्याची सुरूवात करायची ठरवलं आहे.

6/8
शेफालीच्या निधनानंतर सुमारे ८ महिन्यांच्या मोठ्या ब्रेकनंतर पराग आता नव्या जोमाने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याने नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवर एका आगामी मालिकेचा टीझर शेअर केला आहे.

7/8
या टीझरमध्ये पराग एका ऐतिहासिक काळातील शक्तिशाली 'राजा'च्या भूमिकेत दिसत आहे. वाढलेले केस आणि अंगावर राजेशाही पोषाख अशा आक्रमक अवतारात परागला पाहून चाहते थक्क झाले आहेत.

8/8
या प्रोमोच्या कॅप्शनमध्ये त्याने 'लवकरच येत आहे... चंदनबाला' असं लिहिलं आहे. या मालिकेची कथा प्राचीन साम्राज्यावर आधारित असून पराग त्यात एक महत्त्वपूर्ण आणि केंद्रस्थानी असलेला असा दमदार राजा साकारणार आहे.

शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement