advertisement

ट्रम्प नीती अन् बजेटचा फटका! 2011चा इतिहास पुन्हा घडणार? जळगावच्या सराफाची 'भीती' धडकी भरवणार

Last Updated:
मुंबईत सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान. स्वरूप लुंकड यांनी सावधगिरीचा सल्ला दिला, बाजारात तणाव आणि अस्थिरता आहे.
1/7
नितीन नांदुरकर, प्रतिनिधी मुंबई: गुंतवणूकदारच नाही तर सुवर्णबाजार सध्या प्रचंड तणावाखाली आहे. मागच्या चार दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात झालेली अनपेक्षित पडझड ही केवळ बाजार घसरण नसून गुंतवणूकदारांसाठी मोठा धक्का ठरली आहे. ३० जानेवारीच्या सुमारास ४ लाखांच्या पार गेलेली चांदी अवघ्या तीन दिवसांत दीड लाखांनी कोसळली असून, गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

2/7
जळगाव सराफ असोसिएशनचे सचिव स्वरूप लुंकड यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचे दर जे १ लाख ८० हजारांच्या वर गेले होते, ते आता १ लाख ५५ हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत. बजेट सादर झाल्यानंतर त्यात पुन्हा ५ हजार रुपयांची घट झाली.

3/7
मात्र, सर्वाधिक 'धक्का' चांदीने दिला आहे. ४ लाख रुपयांच्या शिखरावरून चांदी आता थेट ३ लाख रुपयांच्या आसपास घसरली आहे. म्हणजेच अवघ्या तीन दिवसांत चांदी दीड लाख रुपयांहून अधिक कोसळली आहे.

4/7
लुंकड यांनी २०११ सालातील एका भयावह आठवणीला उजाळा दिला. त्यावेळी चांदी ३५ हजारांवरून ७८ हजारांवर गेली होती, पण अवघ्या सहा महिन्यांत ती पुन्हा ३४ हजारांवर आली होती. आज अगदी तशीच परिस्थिती चांदीच्या बाबतीत घडताना दिसत आहे.

5/7
ज्या गुंतवणूकदारांनी तेजीच्या काळात चांदीत पैसे गुंतवले, त्यांना या घसरणीमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. सध्या सराफा बाजारात 'तेजी मे तेजी आणि मंदी मे मंदी' असे वातावरण असल्याने प्रचंड अस्थिरता आहे.

6/7
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आगामी नीती काय असेल, याबद्दल जागतिक स्तरावर अनिश्चितता आहे. या जागतिक घडामोडींचा थेट परिणाम स्थानिक बाजारावर होत असल्याने व्यापारी आणि गुंतवणूकदार दोघांमध्येही तणावाचे वातावरण आहे.

7/7
बाजार अजूनही खाली जाण्याची धास्ती आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि विचार करूनच पैसे गुंतवावेत,
बाजार अजूनही खाली जाण्याची धास्ती आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि विचार करूनच पैसे गुंतवावेत," असे आवाहन स्वरूप लुंकड यांनी केले आहे. सध्याची अस्थिरता पाहता, घाईघाईत मोठी गुंतवणूक करणे धोक्याचे ठरू शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
advertisement
IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement