मृत्यूचं तांडव! ढिगाऱ्याखाली गाढले गेले 200 जिवंत मजूर, जगभरातील स्मार्टफोन इंडस्ट्रीला बसणार फटका, कनेक्शन काय?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
रुबाया खाणीत मुसळधार पावसामुळे दोनदा भूस्खलन, २००हून अधिक मृत्यू. M23 गटाचा ताबा, कोल्टन पुरवठ्याचा मोठा स्रोत, सुरक्षिततेचा अभाव आणि मजुरांचे जीवन धोक्यात.
मुसळधार पाऊस कोसळत होता, अंग भिजत होतं, तरीही त्याचे हात चिखलातून काम सुरू होतं, आज थोडं जास्त काम केलं तर उद्या मुलाच्या हातात एखादं खेळणं देता येईल. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. डोंगर कोसळला तो केवळ मातीचा ढिगारा घेऊन नाही, तर हजारो मजुरांच्या शेवटच्या श्वासाला आणि त्यांच्या लेकरांच्या भविष्याला कायमचं मातीत गाडून गेला. काही मिनिटांत होत्याचं नव्हतं झालं. ज्यांच्या घामाने जगाचं तंत्रज्ञान चमकतंय, आज तेच हात आपल्या हक्काच्या माणसांना चिखलातून बाहेर काढण्यासाठी आक्रोश करत आहेत.
कसा झाला अपघात?
यंत्रांशिवाय हाताने खोदकाम सुरू असताना पावसामुळे डोंगर कोसळला. ढिगाऱ्याखाली दबलेल्या २० जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढले असून अद्यापही अनेक मृतदेह चिखलात दबलेले आहेत.
नेमकं काय आणि कुठे घडलं?
कोल्टनच्या खाणीत दोन वेळा भीषण भूस्खलन झालं. डोंगराचा मोठा भाग खचल्यामुळे खाणीत काम करणारे मजूर, बाजारपेठेतील महिला आणि काही लहान मुले मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. पूर्व कांगोमधील उत्तर किवु प्रांतात असलेल्या रुबाया खाणीत ही दुर्घटना घडली. हे ठिकाण गोमा शहरापासून ६० किमी अंतरावर आहे. ही धक्कादायक घटना २८ आणि २९ जानेवारी २०२६ दरम्यान घडली. बुधवारी पहिले आणि गुरुवारी दुसऱ्यांदा भूस्खलन झालं, त्यामुळे त्यातून सावरण्यासाठी मजुरांना कमी संधी मिळाली.
advertisement
का होतात अपघात?
यात २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ही खाण सध्या 'M23' या विद्रोही मिलिशिया गटाच्या ताब्यात आहे. मृतांमध्ये हाताने कोल्टन काढणारे मजूर आणि स्थानिक विक्रेत्यांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगराची माती ढिली झाली होती. खाणीत सुरक्षिततेचे कोणतेही नियम नसल्याने मातीचा ढिगारा थेट मजुरांच्या अंगावर कोसळला.
advertisement
At least 200 are feared dead in a landslide that struck a militia-held mine in DR Congo. The mine produces 15 to 30 percent of the world's supply of coltan, a key component in the production of electronics such as laptops and mobile phones.https://t.co/Dvz9bIti7l pic.twitter.com/6iHDWEAxP9
— AFP News Agency (@AFP) February 1, 2026
advertisement
कोल्टन खाणीचे जागतिक महत्त्व आणि रक्ताळलेला संघर्ष
रुबाया खाण ही जगातील कोल्टन पुरवठ्याचा सर्वात मोठा स्रोत आहे. कोल्टनमधून 'टॅंटलम' नावाचा धातू काढला जातो, जो स्मार्टफोन, लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि एअरक्राफ्ट इंजिनमध्ये अनिवार्यपणे वापरला जातो. जगातील एकूण कोल्टन उत्पादनापैकी १५ ते ३० टक्के उत्पादन याच भागातून येते. दुर्दैवाने, ही खाण एप्रिल २०२४ पासून 'M23' या दहशतवादी गटाच्या ताब्यात आहे. हा गट खाणीतून बेकायदेशीर कर वसूल करतो आणि त्या पैशातून आपला लष्करी संघर्ष चालवतो. यामुळेच या भागात काम करणाऱ्या हजारो गरिबांच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं.
advertisement
दुर्घटना होण्यामागची कारणं काय?
१. येथे कोणतेही इंजिनिअरिंग किंवा सपोर्ट नसतो. लोक फक्त हाताने खड्डे खोदून कोल्टन काढतात.
२. पूर्व कांगोमध्ये पाऊस सुरू झाला की डोंगर खचण्याच्या घटना वारंवार घडतात.
३. खाणीवर दहशतवाद्यांचे वर्चस्व असल्यामुळे सरकार तिथे कोणतेही सुधारणात्मक काम करू शकत नाही.
४. पोटाची खळगी भरण्यासाठी हजारो मजूर आपल्या जिवाची पर्वा न करता या मृत्यूच्या सापळ्यात उतरतात.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 02, 2026 1:53 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
मृत्यूचं तांडव! ढिगाऱ्याखाली गाढले गेले 200 जिवंत मजूर, जगभरातील स्मार्टफोन इंडस्ट्रीला बसणार फटका, कनेक्शन काय?









