Vitamin D Without Sunlight: हिवाळ्यात कमी सूर्य प्रकाशात व्हिटॅमिन डी कसं मिळवाल? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

Last Updated:

How to Get Vitamin D Without Sunlight: टॅमिन डी हे असं जीवनसत्त्व आहे जे आपल्याला नैसर्गिकरित्या सूर्यप्रकाशातून मिळतं. व्हिटॅमिन डीमुळे हाडांची ठिसूळता कमी होऊन हाडं मजबूत व्हायला मदत होते. मात्र जिथे प्रचंड थंडी असते,जिथे सूर्यप्रकाश कमी असतो अशा ठिकाणच्या जनतेने व्हिटॅमिन डी कसं मिळवायचं हे जाणून घेऊयात.

प्रतिकात्मक फोटो : हिवाळ्यात ‘हे’ खाऊन मिळवा व्हिटॅमिन डी, राहाल स्वस्थ आणि निरोगी
प्रतिकात्मक फोटो : हिवाळ्यात ‘हे’ खाऊन मिळवा व्हिटॅमिन डी, राहाल स्वस्थ आणि निरोगी
मुंबई: आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि दैनंदिन क्रियेसाठी अनेकांनी जीवनसत्त्व आणि पोषकतत्त्वांची गरज असते. अनेत जीवनसत्त्वे ही आपल्याला अन्नातून मिळतात. मात्र व्हिटॅमिन डी हे असं जीवनसत्त्व आहे जे आपल्याला नैसर्गिकरित्या सूर्यप्रकाशातून मिळतं. व्हिटॅमिन डीमुळे हाडांची ठिसूळता कमी होऊन हाडं मजबूत व्हायला मदत होते. मात्र जिथे प्रचंड थंडी असते,जिथे सूर्यप्रकाश कमी असतो अशा ठिकाणच्या जनतेने व्हिटॅमिन डी कसं मिळवायचं हे जाणून घेऊयात.
सकाळी कोवळ्या सूर्यप्रकाशात फिरा
पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिकचे विश्वस्त डॉ. सायमन ग्रांट म्हणतात की हिवाळ्यात, ढगाळ वातावरण आणि थंड हवेमुळे अतिनील किरणांचा त्रास कमी असतो. त्यामुळे सकाळच्या वेळी सूर्यप्रकाशात फिरल्याने व्हिटॅमिन डी मिळू शकतं. जर फार थंडी नसेल तर हाफ शर्ट किंवा शॉर्ट्समध्ये फिरल्याचा फायदा होईल.मात्र जर तुमच्याकडे गारवा जास्त असेल तर किमान हात किंवा चेहऱ्यावर 15-30 मिनिटे सूर्यप्रकाशात येईल याची काळजी घ्या. उत्तर भारतात थंडीचा कडाका अधिक असतो, त्यामुळे त्यांच्यासाठी व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढण्यासाठी वेगळ्या पर्यांयाचा विचार करावा लागू शकतो.
advertisement
व्हिटॅमिन डी’वर परिणाम करणारे घटक
व्हिटॅमिन डीच्या पुरेशा उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या सूर्यप्रकाशाचे प्रमाण अनेक घटकांवर अवलंबून असते.

त्वचेचा रंग

अनेक भारतीयांचा रंग हा काळा, सावळा किंवा गहूवर्णिय असतो. जो शरीरातल्या मेलॅनिनच्या रंगावरून ठरतो. मेलॅनिन हे एक नैसर्गिक रंगद्रव्य (pigment) आहे, जे त्वचा, केस, आणि डोळ्यांमध्ये आढळतं. याशिवाय हानिकारक UV किरणांपासून संरक्षण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे ज्यांचा रंग काळा किंवा सावळा आहे त्यांना सूर्यकिरणांमुळे व्हिटॅमिन शोषून घेण्यात अडथळा येऊ शकतो.
advertisement

वय

वृद्ध व्यक्तींमध्ये त्वचेत 7-डिहायड्रोकॉलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असल्यामुळे व्हिटॅमिन डी निर्मिती कमी होते. त्यांना अधिक पूरक आहार किंवा सप्लिमेंट्सची आवश्यकता असते.

कपडे आणि जीवनशैली

भारतासारख्या आग्नेय आशियाई देशांमध्ये, स्त्रिया साडी आणि बुरखा घालतात ज्या त्वचेच्या बराचशा भागावर सूर्यप्रकाश पडत नाही. त्याशिवाय पारंपारिक जीवनशैलीमुळे त्यांचं घराबाहेर पडण्याचं प्रमाणही कमी असतं. त्यामुळे व्हिटॅमिन डी ची कमतरता भासू शकते.
advertisement

हे सुद्धा वाचा :

जर तुम्ही प्रदूषित शहरांमध्ये राहत असाल, तर अतिनील किरणे त्वचेच्या खोल थरांवर क्वचितच परिणाम करू शकतात आणि त्यामुळे व्हिटॅमिन डीच्या उत्पादनात अडथळे निर्माण होऊ शकतात. अशा भागात राहणाऱ्या व्यक्तींना पर्याय म्हणून पूरक अन्नाचा विचार करणं गरजेचं आहे. डॉ. ग्रांट यांच्या मते, भारतात, जीवनसत्व ड चे नैसर्गिक अन्न स्रोत मर्यादित आहेत, परंतु खालील पर्याय मदत करू शकतातः
advertisement

फोर्टिफाइड फूड्स

कमी चरबीयुक्त आणि फोर्टिफाइड डेअरी उत्पादने जसे की दूध, तृणधान्ये आणि संत्र्याच्या रसात अधिक पोषकद्रव्ये आढळतात, जी शरीरासाठी फायद्याची ठरू शकतात. पुरवू शकतात.

मासे

माशांमध्ये सॅल्मन, मॅकेरल आणि सार्डिन यासारख्या चरबीयुक्त माशांचा समावेश आहे. त्यातून व्हिटॅमिन डी मिळू शकतो. मात्र हे मासे भारतीयांमध्ये फारसे लोकप्रिय नाहीत.

सप्लिमेंट्स

व्हिटॅमिन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी व्हिटॅमिन D3 सप्लिमेंट्स खूप प्रभावी आहेत. तुमच्यात व्हिटॅमिनची कमी असेल तर तुम्ही दररोज 400-800 IU व्हिटॅमिन D3 घेऊ शकता. मात्र त्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
advertisement

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचे धोके

व्हिटॅमिन डीची कमतरता ही भारतीयांमध्ये सामान्यपणे आढळून येणारी एक समस्या आहे. हिवाळ्यात किंवा मर्यादित सूर्यप्रकाश असलेल्या भागात, व्हिटॅमिन डीची कमतरता वाढल्याने अनेकांना त्रास होऊ शकतो.
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे अर्भकं आणि लहान मुलांमध्ये रिकेट्स तर प्रौढांमध्ये ऑस्टिओमॅलेशिया आणि ऑस्टिओपोरोसिस सारखे आजार होण्याची भीती असते.
advertisement

कमी रोगप्रतिकारक शक्ती

व्हिटॅमिन डीची पातळी कमी झाल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती धोक्यात येते.त्यामुळे व्हिटॅमिन डीची कमरतरता असलेल्या व्यक्ती सतत आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं.

गंभीर आजार

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मधुमेह, हार्ट ॲटॅक, रक्तवाहिन्यांचे आजार किंवा सततचं नैराश्य असे आजार वाढू शकतात. सूर्यप्रकाशात न जाता पुरेसे व्हिटॅमिन डी कसे मिळवायचे?

सूर्यप्रकाशात न जाता ही व्हिटॅमिन डी कसं मिळवायचं

व्हिटॅमिन डीची कमतरता टाळण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे व्हिटॅमिन डी3 असणारी औषधं किंवा इंजेक्शन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेणे. पूरक आहार आणि 25-हायड्रॉक्सीविटामिन डीची रक्तातील पातळी नियमितपणे तपासल्याने शरीरात व्हिटॅमिन डीची पुरेशी पातळी सुनिश्चित होऊ शकते.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Vitamin D Without Sunlight: हिवाळ्यात कमी सूर्य प्रकाशात व्हिटॅमिन डी कसं मिळवाल? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement