Singhada Health Benefits: हिवाळ्यात शिंगाडा खाण्याचे आहेत खूप फायदे; लहान फळ ठेवेल मोठ्या आजारांना दूर
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Singhada Health Benefits in Marathi: हिवाळ्यात शिंगाड्याचं फळ खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.शिंगाड्याच्या फळात जीवनसत्वे, खनिजं, पोटॅशिअम,मॅगेनीज, मॅग्नेशिअम अशी भरपूर पोषक तत्वे असतात. त्यामुळे शिंगाड्याचं फळ खाल्याने एकूणच आरोग्यात सुधारणा होते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून मोसमी आजारांना दूर ठेवता येऊ शकतं.
advertisement
शिंगाड्यात पाण्याचं प्रमाण जास्त असतं. शिंगाड्याच्या सेवनाने शरीरातली पाण्याची पातळी चांगली राहते. हिवाळ्यात बाहेरची हवा थंड आणि शुष्क असताना तुमचं शरीर हायड्रेटेट ठेवण्याचं काम शिंगाड्याचं फळ करतं. शिंगाड्यात क जीवनसत्व जास्त प्रमाणात असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि साथीच्या आजारांना दूर ठेवता येतं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


